११ जानेवारी २०२० रोजी रेणू शर्मा या महिलेने महाराष्ट्र राज्याचे समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केले आणि राज्यात एकच खळबळ उडाली. पण रोज या प्रकरणात नवे नवे ट्विस्ट येत आहेत. रेणू शर्मा यांचे सर्वपक्षीय कनेक्शन असल्याचे समोर आले आहे.
रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडेंवर बलात्काराचे आरोप केल्यानंतर मुंडे यांनी सविस्तर फेसबूक पोस्ट लिहून या आरोपांचे खंडन केले असले तरी या पोस्टमुळे ते अडचणीत आले. मुंडे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलेली माहिती आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात लपवली होती त्यामुळे मुंडेंची आमदारकी धोक्यात आली आहे. एकीकडे मुंडे यांच्या भवितव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उच्चस्तरीय बैठक सुरु असताना भाजपा नेते आणि माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा हिच्या विरोधात फसवणुकीची तक्रार केली आहे. २०१० पासून रेणू शर्मा माझ्या मागे लागली असून ती मला वेगवगेळ्या कारणांनी फोन आणि मेसेज करायची असे हेगडे यांच्या तक्रारीत म्हटले आहे. हेगडे यांच्या पाठोपाठ मनसेचे नेते मनीष धुरी यांनीही रेणू शर्मा यांच्यावर फसवणुकीचे आरोप केले आहेत. ‘२००८-०९ साली रेणू माझ्या मागे लागली होती. माझा २०१० सालीच धनंजय मुंडे झाला असता’ असे धुरी यांनी म्हटले आहे.
रेणू शर्माने घेतले प्रताप सरनाईकांचे नाव
हेगडे यांच्या आरोपांना रेणू शर्मा यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून हेगडेंचे आरोप फेटाळले आहेत. हेगडे यांनी केलेले आरोप खोटे आणि बोगस आहेत. हेगडे यांना आपण प्रताप सरनाईकांच्या वाढदिवसाच्या सोहळ्यात भेटलो आणि तेच स्वतःहून मला मेसेज करायचे असे शर्मा यांनी सांगितले आहे.
This is motivated action of Mr. Dhananjay Munde after my complaint. I was never involved in any honey trap activity as alleged. Infact Mr.krishna Hegde started the conversation with me. He met me in birthday party of Mr. Pratap SirNaik(MLA).
— renu sharma (@renusharma018) January 14, 2021
हेगडे, धुरी यांच्या आरोपांनी आणि शर्मा यांच्या खुलास्याने त्यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. बलात्काराचे आरोप झालेले मुंडे राष्ट्रवादीचे नेते आहते तर कृष्णा हेगडे हे आधी काँग्रेसमध्ये असून सध्या भाजपामध्ये आहेत. तर मनीष धुरी आणि प्रताप सरनाईक हे मनसे आणि शिवसेना पक्षाशी संबंधित आहेत.