शमीच्या झाडावर ठेवलेली शस्त्रास्त्र काढा आणि वेध घ्या: राज ठाकरे

नुसते फ्लायओव्हर, रस्ते, ब्रिज ही प्रगती नसते. तुमच्या हातात मोबाईल आला लॅपटॉप आला, घरात कलर टीव्ही आला हि प्रगती नसते...

शमीच्या झाडावर ठेवलेली शस्त्रास्त्र काढा आणि वेध घ्या: राज ठाकरे

Remove the weapon placed on Shami's tree and seize it: Raj Thackeray

महाराष्ट्रात दसऱ्याच्या निमित्ताने शिवसेना आणि शि.उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा दसरा मेळावा शनिवार (१२ ऑक्टोबर) संध्याकाळी होणार आहे. असाच दसरा मेळावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) रविवारी (१३ ऑक्टॉबर) ला आयोजित केला आहे. त्याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाईव्ह पॉडकास्ट द्वारे जनतेशी संवाद साधला.

महाराष्ट्रातल्या जनतेशी त्यांच्या ओघवत्या शैलीत संवाद साधताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान त्यांनी दसऱ्याच्या सोनं वाटण्याच्या परंपरेला घेऊन विरोधकांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “दसऱ्याला आपण एक मेकाला सोनं वाटतोय, महाराष्ट्राचं सोनं तर गेली अनेक वर्ष लुटलं जातं आहे, आणि आपण मात्र एकमेकाला आपट्याची पानं वाटतोय“

या पॉडकास्ट राज ठाकरे म्हणाले, “… महाराष्ट्रचं सोनं लुटलं जात असताना, आम्ही कधी स्वतःच्या आयुष्यात मशगूल तर कधी जातीपातीमध्ये मशगूल मग आमचं या लोकांकडे लक्ष राहणार कसं?” “आजचा दसरा हा खूप महत्वाचा आहे आणि तो निवडणुकीच्या तोंडावर आहे. दरवर्षी तुम्ही बेसावध राहता आणि राजकीय पक्ष खेळ करून जातात, या सगळ्यात महाराष्ट्राची प्रगती कुठे चालली आहे.?”

यावेळी त्यांनी महाराष्ट्रात फक्त रस्ते, ब्रिज, फ्लायओव्हर बांधण्याला घेऊन सरकारवर निशाणा साधला आहे, ते म्हणाले, “ नुसते फ्लायओव्हर, रस्ते, ब्रिज ही प्रगती नसते. तुमच्या हातात मोबाईल आला लॅपटॉप आला, घरात कलर टीव्ही आला हि प्रगती नसते, प्रगती इथून (डोक्याकडे बोट करत) व्हावी लागते. आपण परदेशात जातो, तिथले देश पाहतो त्यांना प्रगत देश म्हणतात. अजूनही आपण चाचपडत आहोत.“

हे ही वाचा:

काँग्रेस आमदार सुलभा खोडके यांची पक्षातून हकालपट्टी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अथक परिश्रमाचं राज ठाकरेंकडून कौतुक

सरसंघचालकांनी हिंदू समाजाला वेळीच केलं सावध

मनसे नेत्यांनी ‘दरवेळी आपण त्याच त्याच नेत्यांना निवडून देतो आणि मग कपाळाला हात मारत बसतो’ असा टोलाही लगावलाय. राज ठाकरे यांनी मतदारांना त्यांचं मत शस्त्र असण्याची जाणीव करून दिली आहे. त्यांनी म्हटलंय कि नेत्यांना धडा शिकवण्याची वेळ येते तेंव्हा नेमकी तुम्ही (मतदार) पांडवांप्रमाणे तुमची शस्त्र शमीच्या झाडाला नेऊन टांगता. सोबतच पॉडकास्ट लाईव्ह च्या शेवटी राज ठाकरे यांनी तरुण मुलांना, मुलींना शमीच्या झाडावर ठेवलेली शस्त्र काढा आणि वेध घ्या असं सांगितलं आहे.

Exit mobile version