कट्टरपंथी सोकावले असताना ‘आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही’चा टेंभा मिरवायला शिवसेना तयारच असते

कट्टरपंथी सोकावले असताना ‘आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही’चा टेंभा मिरवायला शिवसेना तयारच असते

दर पौर्णिमेला नाथ पंथीयांसाठी श्रद्धास्थान असलेल्या कल्याणजवळच्या मलंगगडावर मच्छिंद्रनाथांची आरती केली जाते. मात्र या पौर्णिमेला चालू असलेल्या आरतीत मुस्लिम धर्मियांकडून गोंधळ घालण्यात आला आणि ही आरती बंद पाडण्यात आली.

यावरून भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्वीट करताना म्हटले आहे की, ‘मलंग गडावर धर्मांधांनी हैदोस घालून मच्छिंद्रनाथांची आरती बंद पाडावी यापेक्षा कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडवणारे दुसरे लाजिरवाणे उदाहरण नसावे… कट्टरपंथी असे सोकावले असताना ‘आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही’चा टेंभा मिरवायला शिवसेना तयारच असते…’

हे ही वाचा:

गृहमंत्र्यांनी टार्गेट बाजूला ठेवून इथेही जरा लक्ष द्यावे

मोदी आज पुदुचेरीत सभा घेणार

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया होण्याची शक्यता

कोरोनाच्या पार्श्वभूमीव यावर्षी माघ पौर्णिमेला होणारी यात्रा रद्द करण्यात आली. मात्र तरीही धार्मिक विधी करायला परवानगी देण्यात आली. यावेळी नियमाप्रमाणे शासकीय अधिकारी, मानकरी आणि ५० भाविकांच्या उपस्थितीत सर्व धार्मिक विधी पार पाडण्यात आले.

त्यानंतर आरती करण्यासाठी मात्र केवळ सात भाविकांनाच मंदिरात परवनागी देण्यात आली होती. ही आरती सुरू झाल्यानंतर पाचच मिनिटात ५० ते ६० धर्मांध मुस्लिमांनी या आरतीत गोंधळ करायला सुरूवात केली. त्यांनी भाविकांना धक्काबुक्की केली. यावेळी त्यांनी अल्ला हो अकबर अशा घोषणा देखील दिल्या. त्यामुळे या परिसरात काही काळासाठी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. यावेळी उपस्थित पोलिसांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली होती.

Exit mobile version