रिलायन्सकडून ७० हजार रुग्णांना मिळणार ऑक्सिजन

रिलायन्सकडून ७० हजार रुग्णांना मिळणार ऑक्सिजन

७०० टन ऑक्सिजनचा मोफत पुरवठा

देशातील ऑक्सिजनचा पुरवठा वाढविण्यासाठी रिलायन्स उद्योगसमुहाने पुढाकार घेत महाराष्ट्राला १०० टन ऑक्सिजन पुरविण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला होता. आता या उत्पादनात त्यांनी प्रचंड मोठी वाढ करत महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांना मिळून ७०० टन ऑक्सिजन पुरविण्याचे ठरविले आहे. यामुळे विविध राज्यांतील मिळून ७० हजार रुग्णांना ऑक्सिजनमुळे जीवदान मिळणार आहे. मुकेश अंबानी यांच्या जामनगर, गुजरात येथील रिलायन्स उद्योगसमुहातून १०० टन ऑक्सिजनची निर्मिती केली जात होती. पण आता देशभरात करोना संकटामुळे वाढलेली ऑक्सिजनची गरज लक्षात घेता त्यांनी हे उत्पादन प्रचंड वाढविले आहे. वैद्यकीय उपचारांसाठी लागणारा हा ऑक्सिजन असून या उत्पादनाची क्षमता त्यांनी ७०० टक्के वाढविली आहे. या उद्योगातून आता महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, दीप दमण, दादरा नगर हवेली या राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे. विशेष टँकर्समधून हा ऑक्सिजनचा पुरवठा या राज्यांना करण्यात येईल.
रिलायन्सप्रमाणे टाटा उद्योगसमुहाने देखील ऑक्सिजनचा पुरवठा करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे ऑक्सिजनची गरज भागविण्यात रिलायन्स, टाटा असे उद्योगसमूह आपले योगदान देत आहेत. यानिमित्ताने या रिलायन्स उद्योगसमुहाला राजकारणात ओढणाऱ्यांना मात्र चांगलीच चपराक मिळाली आहे. हाच रिलायन्स उद्योगसमूह महाराष्ट्राच्या मदतीला धावून आला आहे. त्याबद्दल ठाकरे सरकारकडून प्रशंसेचा एक शब्दही अद्याप आलेला नाही.

Exit mobile version