पाच वर्षांत देशात रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म!

पंतप्रधान मोदींनी लोकसभेत खासदारांचे कौतुक करत केलं अभिनंदन

पाच वर्षांत देशात रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवार, १० फेब्रुवारी रोजी लोकसभेत १७ व्या लोकसभेतील शेवटचे भाषण केले. अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते बोलत होते. यानंतर महिन्यभरात १८ व्या लोकसभेची निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी नरेंद्र मोदींनी गेल्या पाच वर्षातील कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सर्व खासदार आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांचे आभार मानले. तसेच या काळातील कामांमुळे अनेक पिढ्यांची प्रतीक्षा संपली असं नरेंद्र मोदी म्हणाले.

“१७ व्या लोकसभेच्या पाच वर्षांत आपण आपला वेळ राष्ट्रासाठी समर्पित केला. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या संकल्पांना राष्ट्राच्या चरणांत समर्पित करण्याची ही वेळ आहे,” असा संदेश नरेंद्र मोदी यांनी दिला. नवीन लोकसभा बांधण्यापासून ते राम मंदिर बांधण्यापर्यंत मोदींनी मुद्दे मांडले.

“या पाच वर्षांत देशात रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म पाहिलं. रिफॉर्मपासून परफॉर्म आणि परफॉर्मपासून ट्रान्सफर्म पाहता येणं हे खूप दुर्मिळ आहे. एक नवा विश्वास तयार होत आहे. हे सर्व १७ व्या लोकसभेपासून आज देश अनुभव करत आहे. पूर्ण खात्री आहे की देश १७ व्या लोकसभेला नक्कीच लक्षात ठेवेल,” असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. यानंतर त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. या सभागृहाची उत्पादकता जवळपास ९० टक्के होती असंही मोदींनी स्पष्ट केलं.

“१७ व्या लोकसभेला देव आशीर्वाद देत आहेत. राम मंदिर उभे राहिले. नवीन लोकसभा बांधण्यासाठी सगळेच चर्चा करत होते. अध्यक्ष महोदयांच्या निर्णयक्षमतेमुळे ते शक्य झाले. खासदारांवर टीका होत होती त्यांना एवढ्या रुपयांत जेवण मिळते यावर अध्यक्षांच्या निर्णयामुळे प्रत्येक खासदार एमपी कॅन्टीनमध्ये बाहेरच्या व्यक्तीएवढेच पैसे देतो आहे. या खासदारांनी कोरोना काळात आपल्या वेतनातून ३० टक्के वेतन कपात करण्यात निर्णय घेतला,” असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी खासदारांचे कौतुक केले.

“देशाची पुढील पिढी आपली न्यायसंहिता पाहिल. दहशतवादाविरोधात कठोर कायदे केले गेले. काश्मीरचा ३७० हटविला. तिहेरी तलाक कायदा महिला शक्तीला मुक्ती देऊन गेला हे सर्व काम १७ व्या लोकसभेने केले आहे,” असं नरेंद्र मोदी म्हणाले. तरुणांसाठी ही पाच वर्षे खूप महत्त्वाची ठरली आहेत. व्यवस्थेत पारदर्शीपणा आला आहे. ज्या गोष्टी तरुणांना चिंतेच्या वाटत होत्या त्यावर कठोर कायदे केले आहेत, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.

“येणारी २५ वर्षे देशासाठी महत्त्वाची आहेत. राजकारण, महत्वाकांक्षा आपल्या जागी, परंतु देशाच्या अपेक्षा आकांक्षा या पूर्ण होत आहेत. हा देश इच्छित परिणाम पूर्ण करणार आहे. महात्मा गांधींनी मीठाचा सत्याग्रह केला. तेव्हा ती खूप छोटी घटना वाटत होती. पण त्या घोषणा देशाच्या लोकांना एक शक्ती देऊन गेला. आज देश अशाच वाटेवर आहे,” असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

हे ही वाचा..

ओवैसींकडून लोकसभेत ‘बाबरी मशीद जिंदाबाद’चे नारे

खलिस्तानी दहशतवाद्याच्या सहकाऱ्याच्या घरावर गोळीबार

लोकसभा निवडणुकीपूर्वी सीएए कायदा लागू होणार

उद्योगांना चालना देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत

यावेळी त्यांनी अध्यक्ष ओम बिर्ला यांचेही आभार मानत त्यांच्या हसतमुख चेहऱ्याचे कौतुक केले. ओम बिर्ला हे सतत हसतमुख चेहऱ्याने सामोरे गेले. सभागृहात काहीही झालं तर त्यांचा चेहरा सतत हसतमुख असायचा. प्रत्येक परिस्थिती संतुलित राहून त्यांनी निष्पक्षपणे नेतृत्त्व केले, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.

Exit mobile version