स्कॉटलँडमध्ये सार्वमत पुढच्या पिढीतच

स्कॉटलँडमध्ये सार्वमत पुढच्या पिढीतच

‘स्कॉटलँडला सार्वमतासाठी पुढच्या पिढीची वाट बघावी लागेल’ असे स्पष्ट विधान ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केले आहे. स्कॉटलँडच्या विधीमंडळाच्या प्रमुख नेत्या निकोला स्टर्जन यांनी पुन्हा एकदा सार्वमत घेण्याची गरज असल्याचे म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे हे विधान अतिशय बोलके आहे.

‘बीबीसी’च्या ऍण्ड्र्यू मार शो मध्ये बोलताना, “माझ्या अनुभवानुसार या देशात सार्वमत हे आनंददायी नक्कीच नाही. त्यांच्यात देशाला एक करण्याची ताकद नक्कीच नसते त्यामुळे ते एका पिढीत एकदाच घेतले गेले पाहिजे.” असे बोरिस जॉन्सन यांनी सांगितले.

यापुर्वी स्कॉटलँडमध्ये २०१४ मध्ये युनायटेड किंगडममध्ये राहण्याबद्दल सार्वमत घेण्यात आले होते. मात्र त्यावेळी निसटत्या फरकाने स्कॉटलँडने युनायटेड किंगडममध्ये राहण्यासाठी मतदान केले होते. त्यावेळी स्कॉटलँडच्या प्रमुख नेत्या निकोला स्टर्जन यांनी देखील सार्वमत एका पिढीतच घेतले गेले पाहिजे असे म्हटले होते. मात्र आता युनायटेड किंगडमने युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्या सार्वमतात, स्कॉटलँडने युरोपियन महासंघात राहण्यासाठी मतदान केले होते. त्यामुळे आता परिस्थिती पालटली आहे. म्हणून आणखी एकदा युनायटेड किंगडममध्ये राहण्याबद्दल सार्वमत घेण्याची गरज निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.

Exit mobile version