फोन टॅपिंगच्या आरोपानंतर माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे जावई हरिश राव अमेरिकेला पळून गेले आहेत, असा आरोप तेलंगणाचे मंत्री कोमाटिरेड्डी वेंकट रेड्डी यांनी केला आहे. केसीआर सरकारने व्यापारी आणि न्यायाधीशांसह १२००हून अधिक फोन टॅप केल्याचा आरोप केसीआर सरकारने केला आहे. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सीबीआयने केसीआर यांच्या जावयाविरोधात रेड कॉर्नर नोटीस जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
‘फोन टॅपिंगच्या मागे सूत्रधार माजी एसआयजी डीजी प्रभाकर राव आहे. त्यांच्याच निर्देशांवरून १२०० फोन टॅप केले गेले. ज्यात व्यावसायिकांसह न्यायाधीशांच्या फोनचाही समावेश आहे. विधानसभा निवडणुकीनंतर माजी मुख्यमंत्री केसीआर यांचे जावई हरिश राव आणि प्रभाकर यांना अमेरिकेला पाठवले गेले, हाच याचा पुरावा आहे. आम्ही रेड कॉर्नर नोटिशीच्या मंजुरीसाठी सीबीआयला पत्र लिहिले आहे,’ असे रेड्डी यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
दिल्लीच्या पाणीसंकटाला अन्य राज्ये जबाबदार असल्याचा ‘आप’चा दावा खोटा
के. कविता यांनी १०० कोटी रुपयांची दलाली घेतली
अरुण गवळी उर्फ डॅडीची तुरुंगातून सुटका नाहीच!
निवडणूक आयोगाने मान्य केली चूक म्हणाले, उन्हाळ्यापूर्वी निवडणूका व्हाव्यात!
माजी डीसीपीच्या आरोपानंतर प्रकरण उघड
सन २०२३च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांवर नजर ठेवण्यासाठी कथितपणे राजकीय नेते, व्यापारी आणि टॉलिवूड कलाकारांच्या टेलिफोन उपकरणांवर नजर ठेवण्यात आली होती, असा आरोप माजी डीसीपी पी. राधाकृष्ण राव यांनी केला होता. त्यानंतर भाजपचे खासदार बंदी संजय यांनी तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री राव यांना अटक करण्याची मागणी केली होती.
मद्य घोटाळ्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न
‘मद्यघोटाळ्यात अडकलेली आपली मुलगी के. कविता हिला वाचवण्यासाठी माजी मुख्यमंत्री केसीआर आमदार खरेदी करण्याच्या प्रयत्नात होते, हे स्पष्ट झाले आहे. केसीआर यांनी केवळ कायद्याचीच फसवणूक केली नाही, तर, फोन टॅप करून नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचेही उल्लंघन केले आहे,’ असा आरोप भाजपचे खासदार बंदी संजय यांनी केला होता.