माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाने मंत्रालय मुंबई येथे बोगस नोकरी प्रकरण उघड झाले आहे. मुंडे यांच्या नावाचा वापर करून लिपिक पदाच्या भरतीसाठी हा घोटाळा झाला असून निखिल माळवे या व्यक्तीला एकूण सात लाख ३० हजार रुपये दिल्याप्रकरणी कदम यांनी तक्रार केली आहे. लिपिक पदासाठी खोटे पत्र देण्यात आल्याचे आढळून आले आहे. बोगस लिपिक पदाच्या भरतीसाठी गोवंडी पोलिसांनी मंत्रालय मुंबई येथील एक कर्मचारी आणि त्याच्या साथीदारांना चौकशीसाठी बोलावले होते शिवाय निखिल माळवे, शुभम मोहिते, आणि निलेश कुडतरकर या तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर निखिल माळवे याला अटक करण्यात आली आहे. या मंत्रालय बोगस भरती प्रकरणी आणखी किती जण आहेत किंवा यात कोणा मोठ्या अधिकारी किंवा नेत्याचा हात आहे का याची पोलीस सध्या चौकशी करत आहेत.
घोटाळा कसा झाला उघड?
गोवंडी येथील यशवंत लक्ष्मण कदम हे नुकतेच महापालिकेतून निवृत्त झाले आहेत. त्यांनीच याची तक्रार करून हा गुन्हा नोंदवला. संबंधित पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून घेतला. यशवंत कदम यांचा मुलगा रत्नजीत हा एमएससी झाला आहे. त्याने व्हाट्सअँपवर सरकारी नोकरीची जाहिरात बघितली त्याच जाहिरातींवरून त्याचा निखिल माळवे याच्याशी संपर्क झाला. माळवे याने मंत्रालयाच्या सामाजिक विभागात लिपिक पदासाठी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. आधी ३०,००० रुपयांची सुरवात करून नंतर त्याची मागणी वाढतच गेली .माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याबरोबरचे फोटो त्याने रत्नजीतला दाखवले, आणि मंत्रालयात मुलाखतीला बोलावले.
हे ही वाचा:
आदित्य ठाकरे पोपटपंची काय करता ?
काश्मीरमध्ये आढळला देशातील पहिला लिथियमचा साठा
सागरी जैवविविधता आणि स्वच्छता मोहिमेसाठी सामंजस्य करार
इस्रोचे सर्वात लहान रॉकेट एसएसएल- डी २ अंतराळात झेपावले
मोहिते हा मुंडे यांच्या कार्यालयात शिपाई असल्याचे सांगण्यात आले. त्याच्या व्हाट्सअँपचा डीपी म्हणून धनंजय मुंडेंचा फोटो सुद्धा ठेवला होता. नंतर कांबळे नावाच्या माणसाला भेटून नोकरीची संबंधित कागदपत्रे देण्यात आली. एक डिसेंबर २०२१ ला धनंजय मुंडे यांच्या नावाचे बनावट आदेशपात्र रत्नजीतला मेल केले. हि तात्पुरती निवड असून २९ जानेवारी २०२१ पर्यंत कार्यालयात उपस्थित राहून नोकरीचे आदेश घेण्याचे सांगण्यात आले. ठरलेल्या दिवशी रत्नदीप नोकरीचे पात्र घेण्यास मंत्रालयात गेला असता शुभम गायब होता. चौकशी केली असता तो मुंडेंबरोबर दौऱ्यावर गेल्याचे कळले. निलेश कुडतरकर याने मंत्रालयातील सगळे काम होणार असल्याचे आश्वासन देत राहिला पण आपली फसवणूक झाल्याचे रत्नजीत आणि त्याच्या वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेतली. पुढील तपास चालू आहे.