राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरू असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचे चित्र आहे. लोकसभेच्या गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची नेमणूक झाल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. शिंदे यांच्यासोबत असलेल्यांना शिवसेना म्हणून मान्यता देण्याची विनंती त्यात करण्यात आली आहे.
विधानसभेतील आमदारांमध्ये फूट पडल्यानंतर आपण शिवसेना सोडली नसून शिवसेनेतच असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत होता. शिंदे गटाने भाजपासोबत शिवसेना- भाजपाचे राज्यात सरकार स्थापन केले आहे. आता निवडणूक आयोगाला पत्र लिहिल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
आमच्याकडे दोन तृतियांश संख्याबळ आहे. ५० आमदार आणि १२ खासदारही आमच्याकडेच आहेत. त्यामुळे आमच्या गटालाच शिवसेना म्हणून मान्यता देण्यात यावी, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या या पत्रापूर्वी शिवसेनेनेही निवडणूक आयोगाला एक पत्रं दिलेलं आहे. शिंदे गटाकडून कोणताही दावा केला गेल्यास आमचं म्हणणं ऐकल्याशिवाय निर्णय देऊ नये, अशी विनंती शिवसेनेने निवडणूक आयोगाला केली होती. त्यात आता शिंदे गटाकडून दाव्याचं पत्रं आल्याने निवडणूक आयोग काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
हे ही वाचा:
बँक कर्मचाऱ्यानेच मारला डल्ला; बँकेतून १२ कोटी २० लाख रुपयांची रोकड लंपास
मंत्रिपद देतो म्हणत भामट्यांनी आमदारांकडे मागितले १०० कोटी
राहुल शेवाळे शिवसेनेचे गटनेते, तर भावना गवळी मुख्य प्रतोद
नुपूर शर्मांची हत्या करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी नागरिकाच्या मुसक्या आवळल्या
त्यानंतर शिंदे गटात अनेक पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधी सामिल झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून बंडखोरांवर कारवाई सुरू झाल्यानंतर शिंदे गटाने ठाकरे यांच्या नेतृत्वातील कार्यकारणी बरखास्त केल्याची घोषणा करत स्वत: ची नवीन कार्यकारणी घोषित केली.