पेपरफुटी, कॉपी प्रकरण आढळल्यास संबंधित शाळांवर कडक कारवाई केली जाईल. तसेच शाळेची मान्यता देखील काढून घेतली जाईल. असा थेट इशारा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिला आहे. सध्या राज्यात दहावी बारावी बोर्डाच्या परिक्षा सुरू आहेत. या परीक्षांमध्ये अनेक पेपरफुटीचे, कॉपीचे गैर प्रकार उघडकीस येत आहेत त्यापार्श्वभूमीवर गायकवाड यांनी हा निर्णय घेतला आहे.
काल झालेल्या विधान परिषदेत गायकवाड यांनी परीक्षेच्या गैरप्रकाराच्या कारवाईबद्दल स्पष्ट सांगितले आहे. त्या म्हणाल्या, ” शाळेत कॉपी प्रकरण आढळल्यास संबंधित शाळेला यापुढे परीक्षा केंद्र दिले जाणार नाही. पेपरफुटी, कॉपी प्रकरण आढळल्यास संबंधित शाळांवर कडक कारवाई केली जाईल. कोरोनामुळे दोन वर्षांनंतर दहावीची परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने होत आहे. बोर्डाच्या पहिल्याच पेपरमध्ये उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून गैरप्रकार घडत असल्याची घटना समोर आली आहे. ”
काल दि. १५ मार्च रोजी इ. १० वी मराठी विषयाच्या परीक्षेदरम्यान लक्ष्मीबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नीलजगाव, ता. पैठण, येथे झालेल्या गैरप्रकाराबाबत प्राथमिक चौकशीअंती मुख्याध्यापक, सहशिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी हे विद्यार्थ्यांना कॉपी पुरवीत असल्याचे निदर्शनास आले pic.twitter.com/y2RS7P6P5j
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) March 16, 2022
त्यानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पेपर फुटीप्रकरणी मोठा निर्णय घेतला आहे. कोणत्याही शाळेत पेपर फुटीचे प्रकरण आढळल्यास त्या शाळांची मान्यता काढून घेतली जाईल. आणि कॉपीचे प्रकरण आढळ्यास त्या शाळांना पुढे परीक्षा केंद्र दिले जाणार नाही. अशी घोषणा काल विधान परिषदेत शिक्षणमंत्र्यांनी केली आहे.
हे ही वाचा:
हिजाब प्रकरणी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आज मुस्लीम संघटनांचा ‘कर्नाटक बंद’
गोव्यामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी प्रमोद सावंत यांच्यावर विश्वास
‘एएसआय’ ला पोलीस आयुक्तांची होळीची खास भेट
जनरल बिपिन रावत यांच्या नावाने ‘चेअर ऑफ एक्सलन्स’
दहावीच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे मराठीचा पेपरफुटीची घटना घडली होती. हे प्रकरण समोर येताच त्या शाळेची मान्यता काढून घेण्यात आली आहे. व यापुढेही अशीच कारवाई केली जाईल. तसेच यापुढे परीक्षेला उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांची पूर्ण तपासणी करूनच परीक्षा केंद्रात सोडले जाणार आहे, असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले आहे.