नागपूरमधील कोरोना प्रसाराचे कारण उघड

नागपूरमधील कोरोना प्रसाराचे कारण उघड

राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाढत्या कोरोना संसर्गावरून राज्यातील आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. आरटीपीसीआर चाचण्यांचा रिपोर्ट वेळेवर मिळत नसल्यानेच नागपूरमध्ये सुपर स्प्रेडरकडून कोरोनाचा संसर्ग फैलावला जात असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला आहे. नागपूरच्या ग्रामीण भागात कोरोनाची विदारक परिस्थिती आहे. ग्रामीण भागात पाच ते सात दिवसानंतर आरटीपीसीआर चाचण्यांचा रिपोर्ट येत आहे. त्यामुळे आपल्याला कोरोना झालाच नाही, अशा अर्विभावात संशयित रुग्ण फिरत असतात. त्यामुळे त्यांच्यामुळे इतरांनाही कोरोनाची लागण होत आहे. परिणामी नागपूर ग्रामीणमधील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. केवळ नागपूरच्या ग्रामीण भागातच नव्हे तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मतदारसंघातही आरटीपीसीआर चाचण्यांचा अहवाल सहा दिवसांनी येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

हे ही वाचा:

पश्चिम बंगालमध्ये आज चौथ्या टप्प्याचे मतदान

पश्चिम बंगालमध्ये पराभव अटळ, तृणमूलच्या ‘या’ नेत्याची कबुली

नागपूरमध्ये कोरोना रुग्ण असलेल्या हॉस्पिटलला आग

रेशीमबागेत कोरोनाचा शिरकाव…सरसंघचालकांना झाली लागण

गेल्या १४ महिन्यांपासून राज्यात कोरोनाचं संकट आहे. कोरोनाचं संकट महाभयंकर असल्याचं राज्याचे मंत्री वारंवार सांगत असतात. परंतु, या १४ महिन्यात नागपूरच्या ग्रामीण भागात साधी आरटीपीसीआर चाचणीची सोय करण्यात आलेली नाही. तसेच शहरातून रिपोर्ट येईपर्यंत रुग्णांवर उपचार होत नाही. सुपर स्प्रेडरचं टेस्टिंग होत नाही, प्रशासन करत असलेले सर्व दावे फोल ठरत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

Exit mobile version