शेहजाद चर्चेत नको; काँग्रेसच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा बुरखा फाटला

शेहजाद चर्चेत नको; काँग्रेसच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा बुरखा फाटला

एकीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गेल्या काही वर्षांत कसा संकोच झाला आहे, अशी आरडाओरड करणारी काँग्रेस स्वतः अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर कशी संकुचित आहे, याचे ढळढळीत उदाहरण एबीपी न्यूजच्या एका चर्चेच्या कार्यक्रमानिमित्त पाहायला मिळाले. सातत्याने उजव्या विचारसरणीची बाजू समर्थपणे मांडणारे शेहजाद पुनावाला यांनी स्वतः ट्विट करून काँग्रेसकडून या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कसा गळा घोटला गेला हे स्पष्ट केले आहे.

सध्या गाजत असलेल्या टूलकिट मुद्द्यावर एबीपी न्यूजने शुक्रवारी (२१ मे) सायंकाळी ५ वाजता एक चर्चेचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी शेहजाद पुनावाला यांना आमंत्रित केले होते. पण शेहजाद यांच्या मते ४.१५ वाजता त्यांना एबीपी न्यूजकडून फोन आला की, काँग्रेसच्या दबावामुळे त्यांना चर्चेला बोलावता येणार नाही. शेहजाद यांनी एबीपी न्यूजच्या कर्मचाऱ्याशी झालेल्या संवादाचा ऑडिओ आपल्या ट्विटमध्ये टाकला आहे.

हे ही वाचा:

सावरकरांच्या जयंतीदिनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य आणि समाजसेवा पुरस्कार’ वितरण

वाझेपाठोपाठ एपीआय रियाझ काझीचीही गच्छंती

हवेत गेलेले पाय जमिनीवर आलेलं बघून बरं वाटलं

मुख्यमंत्री म्हणाले, पंचनाम्यानंतरच मदत!

त्यांनी त्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, काँग्रेसच्या असहिष्णुतेहा खरा चेहरा. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आणि प्रसारमाध्यमांना दबावाखाली आणण्याचे तंत्र. आज २ वाजता एबीपी न्यूजने मला टूलकिट या विषयावर ५ वाजता होणाऱ्या चर्चेसाठी मला आमंत्रित केले होते. पण सव्वाचार वाजता एबीपी न्यूजकडून मला सांगण्यात आले की, काँग्रेसच्या दबावामुळे तुला बोलावता येणार नाही.

त्याचा पुरावा म्हणून त्या कर्मचाऱ्याशी झालेल्या संवादाचा ऑडिओदेखील त्यांनी सोबत जोडला आहे. त्यात कर्मचारी म्हणतो की, काँग्रेसच्या दबावामुळे शेहजादला या चर्चेतून वगळावे लागत आहे. त्यावर शेहजादने विचारले की, कुणी असा दबाव आणला त्यावर तो कर्मचारी म्हणतो की, वरून दबाव आला मला नेमके माहीत नाही, शेहजादच्या या ट्विटवर अनेक नेटकऱ्यांनी काँग्रेसच्या या अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या मागील खऱ्या चेहऱ्यावर सडकून टीका केली आहे.

 

शहजाद पूनावाला हे काही वर्षांपूर्वी कॉंग्रेस पक्षाचे सक्रिय सदस्य होते. त्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची तयारी केली आणि काँग्रेस पक्ष आणि पूनावाला यांच्यात दुरावा आला. तेव्हापासून पूनावाला हे कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही पण एक राजकीय विश्लेषक म्हणून ते अनेक टीव्ही वरच्या चर्चांमध्ये सहभागी होत असतात.

Exit mobile version