मशिदीवरील लाऊडस्पीकर परवानगीसाठी रझा अकादमीची पोलीस आयुक्तांना विनंती

मशिदीवरील लाऊडस्पीकर परवानगीसाठी रझा अकादमीची पोलीस आयुक्तांना विनंती

राज्यात सध्या मशिदीवरील भोंग्यांवरून राजकारण तापले आहे. मशिदीवरील भोंगे काढा अन्यथा आम्ही लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावू असा पवित्रा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतला आहे. दरम्यान, रझा अकादमीने मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याकडे मशिदीवरील लाऊडस्पीकरसाठी परवानगी मागितली आहे.

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांना रझा अकादमीने पत्र पाठवून ही विनंती केली आहे. पत्रात रझा अकादमीने, मुंबईत काही लोक अजानसाठी लाऊड ​​स्पीकरच्या वापरावर शंका घेत आहेत. त्यामुळे मुंबईतील मशिदींना लाऊडस्पीकर वापरण्याची परवानगी देण्याची विनंती आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन आम्ही  करू आम्हाला परवानगी द्यावी, असे लिहले आहे. त्यानंतर रझा अकादमीने पुढे हेही म्हटले आहे की, मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांना यासंदर्भात अर्ज करणार्‍यांना त्वरित परवानगी देण्याची सूचना द्यावी.

हे ही वाचा:

कुरापती चीनने सीमेवर उभारले तीन टॉवर

कुचिक प्रकरणी माझ्यावरील आरोप धादांत खोटे

संजय पांडे रझा अकादमीच्या इफ्तार पार्टीत; महाविकास आघाडीचे हेच धोरण आहे का?

कुरापती चीनने सीमेवर उभारले तीन टॉवर

दरम्यान, राज्यात सध्या मशिदीवरील भोंग्यांवरून राजकारण तापले आहे. राज ठाकरेंनी ३ मे पर्यंत अल्टीमेटम दिले आहे. आज राज्याच्या गृहविभागाने राज्यात भोंगे आणि लाऊडस्पिकर लावताना स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार असल्याचे सांगितले आहे. तसेच मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी रझा अकादमीच्या रफ्तार पार्टीला हजेरी लावली होती.

संजय पाडेंनी रफ्तार पार्टीला हजेरी लावल्याने त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी त्यांच्यावर कोणता महाविकास आघाडीचा दबाव आहे का? असा सवालही उपस्थित केला आहे. ज्यांच्यावर आपल्या सुरक्षतेची जबाबदारी आहे  दहशवादी, देशद्रोहिंना भेटत आहेत, अशी टीका राणेंनी पांडे यांच्यावर केली आहे.

Exit mobile version