मुख्यमंत्र्यांचे विश्वासू रवींद्र वायकरांची ईडीकडून ८ तास चौकशी

मुख्यमंत्र्यांचे विश्वासू रवींद्र वायकरांची ईडीकडून ८ तास चौकशी

राज्याचे मुखमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती आणि विश्वासू शिवसेना आमदार रवींद्र वायकर हे सध्या ईडीच्या रडारवर आहेत. रवींद्र वायकर यांची मंगळवारी २१ डिसेंबर रोजी तब्बल ८ तास ईडीकडून चौकशी करण्यात आली. नेमक्या कोणत्या प्रकरणावरून रवींद्र वायकर यांची चौकशी करण्यात आली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

रविंद्र वायकर हे मंगळवारी दुपारी ईडी कार्यालयात हजर झाले होते. त्यानंतर तब्बल ८ तास त्यांची ईडी कार्यालयात कसून चौकशी करण्यात आली. वायकर यांना नेमकं कोणत्या प्रकरणी ईडीने चौकशीसाठी बोलावले होते, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. वेगवेगळ्या प्रकरणांच्या अनुशंगाने ईडीने वायकर यांना चौकशीसाठी समन्स बजावले असल्याचे वृत्त ‘टीव्ही ९’ने दिले आहे. या चौकशीतून आता नेमक्या काय बाबी समोर आल्यात, हे लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आजपासून श्रीगणेशा

जर्मन नवरदेव आणि रशियन वधू हिंदू पद्धतीने लग्नबंधनात

… म्हणून दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार अतिरिक्त वेळ

ब्रिटनमधील शीख खासदाराने हिंदू विरोधी ट्विट हटवले

रविंद्र वायकर हे माजी मंत्री होते. तसेच ते मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळचे म्हणून ओळखले जातात. त्यांच्या चौकशीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. प्रताप सरनाईक, अनिल देशमुख, हसन मुश्रीफ, भावना गवळी, अजित पवार यांचे नातेवाईक, प्राजक्त तनपुरे, अर्जुन खोतकर यांच्या नंतर आता रवींद्र वायकर हे ईडीच्या रडारवर आहेत.

Exit mobile version