पराभव जिव्हारी लागल्यामुळेच ठाकरे गटाची रडारड!

ईव्हीएम मशीन हॅक प्रक्लारणी रवींद्र वायकरांचा ठाकरे गटाला सणसणीत टोला

पराभव जिव्हारी लागल्यामुळेच ठाकरे गटाची रडारड!

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अद्यापही ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर आणि शिवसेना नेते, खासदार रवींद्र वायकर यांच्यामधील निकालाच्या मुद्द्यावरून वाद सुरू आहे. मुंबई उत्तर पश्चिम मध्य लोकसभा मतदार संघाचा निकाल हा आरोप प्रत्यारोपांच्या गर्तेत सापडला आहे. रवींद्र वायकर यांनी अमोल किर्तीकर यांचा अवघ्या ४८ मतांनी पराभव केला. मात्र, यानंतर ठाकरे गटाकडून या मतमोजणीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच रवींद्र वायकर यांच्या मेहुण्याविरोधात मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल नेल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणावर आता रवींद्र वायकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ठाकरे गटाला सणसणीत टोला लगावला आहे.

“एक हजार पोलीस, २० उमेदवारांचे प्रतिनिधी आणि २० च्या २० उमेदवार मतमोजणी केंद्रामध्ये होते. तर, रवींद्र वायकर आत जाऊन काहीतरी वेगळं कसं करू शकतो? फक्त रडीचा डाव चालला आहे. हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे. या रडीच्या डावाला मी महत्त्व देत नाही. त्यांना जे काय करायचं ते करूद्या. निवडणूक आयोगाने योग्य पद्धतीने निवडणूक घेतली असून असं ईव्हीएम मशीन हॅक करता येत का? हे जे काय चाललं आहे, हा रडीचा डाव आहे. त्यामुळे मला यावर उत्तर द्यावसं वाटत नाही, तरीही मी यावर स्पष्टीकरण दिलं आहे,” असं रवींद्र वायकर यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा:

बाबरी मस्जिद नाही तर आता ‘तीन घुमट रचना’!

देशात नवे सहकार धोरण लवकरच !

बांगलादेशच्या सीमेवरून महिन्याला २०० हून अधिक रोहिंग्यांची घुसखोरी

सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याच्या राजस्थानमधून आवळल्या मुसक्या

ठाकरे गटाकडून मात्र अद्याप आरोप केले जात आहेत. मुंबई उत्तर पश्चिम मध्य लोकसभेच्या निवडणुकीबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “मुंबई उत्तर पश्चिम मध्य लोकसभा निवडणुकीतील काहीतरी गोंधळ झाला आहे. येथील सीसीटीव्ही फुटेज निवडणूक आयोगाकडे मागितली होती. मात्र, निवडणूक आयोगाने ते द्यायला नकार दिला आहे. त्यामुळे अशा उमेदवारांना जर पदाची शपथ दिली तर लोकशाहीचा खून झाला आहे, असं समजून काम करावं लागेल, अशा लोकांना शपथ कशी देऊ शकता?,’ अशी टीका त्यांनी केली आहे.

Exit mobile version