लोकसभा २०२४ निवडणुकीत मुंबईतील उत्तर- पश्चिम मतदरासंघातील शिवसेनेचे नेते रवींद्र वायकर यांना खासदारकी प्रकरणी दिलासा मिळाला आहे. त्यांची खासदारकी कायम राहणार आहे. वायकरांच्या खासदारकीला आव्हान देणाऱ्या ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तीकर यांची निवडणूक याचिका उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली आहे.
निवडणूक निकालाच्या विरोधात ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High court) याचिका दाखल केली होती. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार रवींद्र वायकर यांचा ४८ मतांनी विजय झाला होता. तर अमोल कीर्तीकर यांना पराभव स्वीकाराला लागला होता. मतमोजणी प्रक्रियेत गोंधळ झाल्याची तक्रार अमोल कीर्तीकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका आता मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
कीर्तीकर यांची याचिका ऐकण्या योग्य नाही. याचिकेची मांडणी योग्यरित्या करण्यात आलेली नाही. तसेच टेंडर मते ही विजयी उमेदवाराला कशी मिळाली हे दाखविण्यास कीर्तीकर अपयशी ठरले आहेत. त्यामुळे, त्यांची याचिका फेटाळून लावावी हा वायकर यांच्यावतीने करण्यात करण्यात आलेला दावा न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकलपीठाने योग्य ठरवला आणि कीर्तीकर यांची याचिका फेटाळली.
हे ही वाचा :
आमचे सरकार आल्यावर बघून घेऊ; सपा खासदार बर्क यांच्या घरावर वीज विभागाने छापा टाकताच वडिलांची धमकी
स्पीड बोटीतला माणूस प्रवासी बोटीच्या डेकवर येऊन पडला आणि…
कुणीच लाईफ जॅकेट वापरले नाहीत, म्हणून…
प्रवासी बोटीला धडकणाऱ्या नौदलाच्या स्पीड बोट चालकावर गुन्हा दाखल
अमोल कीर्तीकर यांचा रवींद्र वायकर यांच्याकडून ४८ मतांनी पराभव झाला होता. वायकर यांना ४,५२,६४४, तर कीर्तीकर यांना ४,५२,५९६ मते मिळाली होती. मतमोजणीच्या दिवशीच तफावत आढळून आल्याने पुन्हा मतमोजणीसाठी अर्ज दाखल केल्याचा दावा केला होता, असा दावा करून उत्तर-पश्चिम मतदारसंघातील खासदार म्हणून वायकरांची निवड रद्दबातल करावी, तसेच, आपल्याला निर्वाचित उमेदवार म्हणून घोषित करण्याची मागणी कीर्तीकर यांनी निवडणूक याचिकेतून केली होती.