भारत सरकारचे ‘कू’ ‘कू’च ‘कू’

भारत सरकारचे ‘कू’ ‘कू’च ‘कू’

भारताचे माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी राज्यसभेत ‘कू’ ऍपचे कौतुक केले. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करून ‘कू’ ऍप वर जोडले जाण्याचे आवाहन केले होते आणि आता रवी शंकर प्रसाद यांनी राज्यसभेत ‘कू’ चे कौतुक केले आहे, त्यामुळे आता भारत सरकार स्वतः एक प्रकारे स्वदेशी ‘कू’ ऍप ला प्राधान्य देण्याच्या मार्गावर असल्याचे दिसते.

“कू ऍप भारतात तयार झाले असून त्याच्या यशाबद्दल आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. ही माझ्यासाठी भारतीय म्हणून अभिमानाची बाब आहे की आज अनेक भारतीय तंत्रज्ञानाच्या कंपन्यांचे नेतृत्व करत आहेत. आपण या सर्व धाडसी स्टार्ट अप्स ना सलाम करूया” असे प्रसाद हे आज राज्यसभेत बोलताना म्हणाले.

हे ही वाचा:

स्वदेशी ‘कू ऍप’ ची ट्विटरला टक्कर

प्रत्येक क्षेत्रात ‘आत्मनिर्भरतेचे’ लक्ष्य बाळगून आगेकूच करणाऱ्या भारताला आता सोशल मीडियातही अस्सल भारतीय पर्याय उपलब्ध होत आहते. जागतिक स्तरावर बोलबाला असलेल्या ट्विटरला टक्कर देण्यासाठी ‘कू ऍप’ ची सर्वत्र चर्चा सुरु आहे. एकीकडे भारत सरकार आणि ‘ट्विटर’ चे संबंध ताणले गेले असतानाच भारतात ‘कू’ ऍप्लिकेशनची हवा सुरु झाली आहे आणि त्याला भारतीयांचा भरभरून प्रतिसादही मिळताना दिसत आहे.

पियुष गोयल आणि रवि शंकर प्रसाद यांच्या सोबतच इतर अनेक मंत्री आणि मंत्रालयाची खाती कू ऍपवर आहेत.

हे ही वाचा:

भारतात काम करा, परंतु राज्यघटनेचे पालन करा

Exit mobile version