अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी आज पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे. यावेळी राणा दाम्पत्याने पुन्हा एकदा हनुमान चालीसा म्हणण्याची घोषणा केली आहे. शनिवार, १४ मे रोजी दिल्ली येथील हनुमान मंदिरात राणा दाम्पत्य हनुमान चालीसा म्हणणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राणा दाम्पत्य हनुमान चालीसा पठण करणार आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतल्या सभेच्या दिवशीच राणा यांचा हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे आता राणा यांच्या या पावित्र्य नंतर शिवसेना विरुद्ध राणा दाम्पत्य हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्याची दुर्दशा सुरु आहे. त्यासाठी आम्ही हनुमान चालीसा पठणाचे ठरवले तर आम्हाला राजद्रोहाचे कलम लावून अटक केली. हे इंग्रजांच्या काळातील कलम आहे. हे सरकार इंग्रजांच्या काळातील कायदे वापरते हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. पण आता सर्वोच्च न्यायालयाने हे कलम रद्द केले आहे. त्यास्तही राणा यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभारही मानले. तर त्यासोबतच केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचेही आभार मानले.
हे ही वाचा:
राजद्रोहाच्या सर्व खटल्यांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती!
बसपा नेत्याने अपहरण करून विकल्याचा विद्यार्थीनीचा आरोप
एलॉन मस्क यांनी केली ही मोठी घोषणा
‘आडनावांवरून पालिका कारवाई करते आहे का’?
यावेळी आमदार रवी राणा यांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खुश करण्यासाठी पांडे यांनी आपल्याला अटक केली असा दावा राणा यांनी केला आहे. तर उद्धव ठाकरे यांनी संजय पांडेना लालूच दिल्याचेही राणा यांनी म्हटले आहे. तर महाराष्ट्रात तुरुंगात असताना आपल्याला वाईट वागणूक मिळाल्याची तक्रारही राणा यांनी केली आहे.