संसदीय समितीच्या संरक्षण समितीचे सदस्य सध्या लडाख दौऱ्यावर आहेत. यामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि खासदार नवनीत राणा तिकडे आहेत. दरम्यान, खासदार आपल्यासोबत कुटुंबातील एका व्यक्तीला सोबत घेऊन जाण्याची परवानगी होती. यामध्ये नवनीत राणा यांच्यासोबत आमदार रवी राणा हे लडाख दौऱ्यावर उपस्थित होते.
यावेळी रवी राणा यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. त्यावेळी त्यांनी शिवसेनेला धारेवर धरले आहे. ते म्हणाले, आम्ही आमचा दौरा पूर्ण करण्यासाठी आलो आहोत. आपली संस्कृती म्हणून आम्ही एकत्र दौरा केला. मात्र हनुमान पठणावेळी जसं मुंबईत भाष्य केले आहे ते आम्ही विसरणार नाही, असं स्पष्ट त्यांनी सांगितलं आहे. पुढे ते म्हणाले, भ्रष्टाचाराविरुद्ध माझी लढाई सुरूच राहणार आहे. हनुमान चालीसा पठणासाठी मुंबईत आल्यानंतर राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली आम्हला तुरुंगात जावं लागलं. याबद्दल जेव्हा संजय राऊत यांना विचारणा केली तेव्हा त्यांच्याकडे याचे उत्तर नव्हते. त्यांनी फक्त एवढं म्हटलं की, वरच्या स्थरावर जे काही झालं ते होत यामध्ये आमचा काही संबंध नव्हता एवढेच उत्तर राऊत यांनी दिले. अशी माहिती रवी राणा यांनी दिली.
हे ही वाचा:
२०२० चे प्रकरण उकरून काढत, केतकी चितळेंवर कारवाई
मुंबई विमानतळावर मुंबई- बंगळुरू विमानाचे आपत्कालीन लॅन्डिंग
राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित
जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर निर्माणाधीन बोगद्याचा भाग कोसळला
पुढे ते म्हणाले, माणुसकीच्या नात्याने आपुलकीच्या नात्याने वागणं आपलं कर्तव्य असल्याने आम्ही एकत्र दौरा केला. ते म्हणाले. त्यांनी असाही सवाल केला की, आम्ही कोणता एवढा मोठा गुन्हा होता की आम्हला तुरुंगात टाकले? मुख्यमंत्री पदाचा फायदा घेत आहेत. सत्तेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व गहाण ठेवले. राजकारणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगजेबाच्या कबरीवर फुले उधळतील, असा गंभीर आरोप रवी राणा यांनी केला आहे. मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराची लंका नष्ट करायची आहे. यासाठी आम्ही पर्यंत करत आहोत, असंही रवी राणा म्हणाले आहेत.