आमदार रवी राणा यांचा आरोप
शनिवार, २१ मे रोजी मुंबई महापालिकेने राणा दाम्पत्यांना त्यांच्या निवासात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे. यावर आमदार रवी राणा यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. आम्हाला मुंबई महापालिकेने फसवलं असल्याचा गंभीर आरोप रवी राणा यांनी शिवसेनवर केला आहे.
मुंबई महापालिकेने जी राणा दाम्पत्याला अनधिकृत बांधकामाची नोटीस पाठवली आहे, ती चुकीची असल्याचे रवी म्हणाले आहेत. ते म्हणाले, आमच्या खार येथील इमारतीच्या बिल्डरला पालिकेने परवानगी दिली. मात्र आमच्या आठव्या माळ्यावरच्य घरातील बांधकाम अनधिकृत असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. पालिकेने आम्हाला फसवलं आहे.
हे ही वाचा:
मुंबई विमानतळावर मुंबई- बंगळुरू विमानाचे आपत्कालीन लॅन्डिंग
राणा दाम्पत्याला मुंबई महापालिकेकडून अल्टिमेटम
नवाब मलिकांचे दाऊदच्या टोळीशी थेट संबंध
शिवलिंगाबद्दलची आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर प्राध्यापकाला अटक
यावेळी रवी राणा यांनी पालिकेला इशारा दिला आहे. ते म्हणाले, महापालिकेने येऊन इमारतीचे मोजमाप करावे. ज्या बिल्डरने आमची इमारत बांधली त्याने अजून दहा इमारती बांधल्या आहेत. तेव्हा इतर इमारतींचीही चौकशी करावी तेव्हा इमारत बांधकामाला पालिकेने कशी परवानगी दिली? असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे. पालिकेने त्या बिल्डरने बांधलेल्या सर्व इमारतींचे मोजमाप करावे असे रवी राणा म्हणाले आहेत. रवी राणा म्हणाले, सरकारच्या विरोधात कोणी बोलले तर त्याला अश्या कारवाईला सामोरे जावे लागते, असंही राणा म्हणाले. दरम्यान, मुंबई महापालिकेने आज नोटीसद्वारे राणा दाम्पत्याला अल्टिमेटम दिले आहे.