शिवसैनिक सोडून राणा दाम्पत्यालाच अटक

शिवसैनिक सोडून राणा दाम्पत्यालाच अटक

महाराष्ट्राचे मुख्य मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी जाऊन हनुमान चालीसा म्हणण्याचा निर्धार करणाऱ्या राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मुंबई येथील राणा यांच्या निवासस्थानी जाऊन पोलिसांनी त्यांना अटक करत खार पोलीस स्टेशनला आणले आहे. त्यामुळे राणा विरुद्ध शिवसेना असा संघर्ष महाराष्ट्रात अधिकच तीव्र होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

बडनेराचे आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत कौर राणा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालीसा म्हणण्याचा निर्धार केला होता. त्यामुळे त्यांच्या विरोधात शिवसेना संघटना आक्रमक झाली. दिवसभर शिवसैनिकांनी मुंबई येथील राणा यांच्या घराबाहेर राडा घातला. असे असले तरीदेखील त्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या विरोधात कोणताही गुन्हा पोलिसांनी दाखल केला नाही.

हे ही वाचा:

राणांच्या समर्थनार्थ राणे

हनुमानच शिवसेनेला धडा शिकवेल

खासदार झाले तेव्हा संजय राऊत मतदारही नव्हते

‘राणांच्या घरावर हल्ला करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनीच दिले’

पण राणा दाम्पत्याच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १५३ अ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दोन समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य करण्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. हे कलम अजामीनपात्र असून पोलीस त्यांना जामीन देऊ शकत नाहीत. त्यामुळे आजची रात्र राणा दाम्पत्याला पोलीस स्थानकात काढावी लागणार आहेत.

तर उद्या राणा पती-पत्नीला बांद्रा येथील न्यायालयात हजर केले जाणार आहे. रविवार असल्यामुळे दैनंदिन न्यायालय बंद असून सुट्टीच्या न्यायालयात राणा यांना हजर केले जाणार आहे. त्यामुळे न्यायालय त्यांना जामीन देणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Exit mobile version