आम्हाला हनुमान चालिसा वाचू न दिल्यानेच उद्धव ठाकरे यांचे ४० आमदार फुटले अशा शब्दांत आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर टीका केली. आम्हाला जेलमध्ये सतरंजी दिली नाही. आता ठाकरेंकडे सतरंजी उचलण्यासाठीही कुणी राहिले नाही, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.
जळगाव येथे एका कार्यक्रमात राणा दांपत्याने ही घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
ज्या महाविकास आघाडीची गुलामी करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते. त्या गुलामीची भाषा ते बोलत होते त्यामुळेच त्यांनी आमच्या हनुमान चालिसाला विरोध केला आणि आम्हाला तुरुंगात टाकले. ती परिस्थिती पाहा. आम्हाला सतरंजी दिली नाही आता त्यांच्यासाठीही सतरंजी उचलणारेही राहिले नाहीत. त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांनीही यावेळी उद्धव यांना इशारा दिला.
हे ही वाचा:
ईडी नशा उतरवणार, दिल्लीसह अनेक राज्यात छापेमारी
नितेश राणे यांच्या गाडीला अपघात पण कुणालाही इजा नाही
थायलंडवासियांची ‘वार्ता आरती’ची पाहिलीत का?
बेंगळुरूतील आयटी कर्मचाऱ्यांच्या कार गेल्या वाहून, ट्रॅक्टर आला धावून
मी पण कमजोर नाही. तुम्ही ठाकरे आहात तर मी राणा आहे. तुमची किती ताकद आहे माझी किती आमना सामनाहोऊन जाऊ द्या. असे त्या म्हणाल्या.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित झाला तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा म्हणणार असल्याचे राणा दांपत्याने म्हटले होते. त्यांना त्यांच्या खार येथील घरातूनही बाहेर पडता आले नाही. मात्र त्यांना अटक करण्यात आली. काही दिवस ते कोठडीत होते. त्यावरून राणा दांपत्य आणि शिवसेना यांच्यात वितुष्ट निर्माण झाले. नवनीत राणा यांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. त्यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता.