आयुष्यभर गटातटाचं राजकारण करणाऱ्या राऊतांना ‘भाजपचा परिवार’ काय कळणार!

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

आयुष्यभर गटातटाचं राजकारण करणाऱ्या राऊतांना ‘भाजपचा परिवार’ काय कळणार!

नितीन गडकरींचा पराभवा करण्यासाठी पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांनी प्रयत्न केले. त्यासाठी फडणवीसांनी रसद पुरवली असं संघाचे लोक सांगतात, असे संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या ‘रोखठोक’ सदरातून म्हटलं आहे.संजय राऊत यांच्या आरोपावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राऊत हे उद्धव ठाकरे यांचे कर्मचारी आहेत पण ते शरद पवार यांची चाकरी करतात. भाजप हा पक्ष नाही तर परिवार आहे. ज्यांनी आयुष्यभर गटातटाचं राजकारण केलं त्या संजय राऊतांना परिवार काय कळणार?, अशी टीका बावनकुळे यांनी संजय राऊतांवर केली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे ट्विटकरत म्हणाले, उबाठाचे अधिकृत आणि शरद पवार गटाचे स्वयंघोषित प्रवक्ते संजय राऊत यांनी आज पुन्हा अकलेचे तारे तोडत भाजपच्या अंतर्गत राजकारणावर भाष्य केलं आहे. राऊत हे उद्धव ठाकरे यांचे कर्मचारी आहेत पण ते शरद पवार यांची चाकरी करतात. ते भ्रमिष्ट अवस्थेत ‘रोखठोक‘ लिहित असावेत. भाजप हा पक्ष नाही तर परिवार आहे. ज्यांनी आयुष्यभर गटातटाचं राजकारण केलं त्या संजय राऊतांना परिवार काय कळणार?

हे ही वाचा:

पाकिस्तानमध्ये कुराणच्या अवमानाचा आरोप करत जमावाचा ख्रिश्चनांवर हल्ला!

चारधाम यात्रेत १५ दिवसांत २०० कोटींहून अधिक व्यवसाय!

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पाचही टप्प्यांतील मतदानाची आकडेवारी जाहीर!

राजकोट दुर्घटनेप्रकरणी गेम झोन मालकासह तिघांना अटक!

ते पुढे म्हणाले, आदरणीय मोदीजी, अमित भाई, योगीजी, नितीनजी, देवेंद्रजी हे भाजपच्या एकाच परिवारातील सदस्य आहेत. प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः हे मूल्य घेऊन भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता काम करतो. पण संजय राऊतांच्या बाबतीत प्रथम शरद पवार नंतर स्वतः आणि शेवटी उद्धव ठाकरे आणि उबाठा गट असा क्रम आहे. त्यामुळे राऊतांच्या डोक्यातून असंच काहीतरी बाहेर पडणार.

२०१९ मध्ये स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी संजय राऊतांनीही प्रयत्न केले होते. पण त्यांचा डाव यशस्वी झाला नाही. हिंमत असेल तर एक ‘ रोखठोक‘ त्यावरही येऊ द्या, असं बावनकुळे म्हणाले.

Exit mobile version