लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात आमच्यामुळेचं काँग्रेसच्या जागा वाढल्या आहेत, असा दावा ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शिवाय लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवेल असं संजय राऊत म्हणाले आहेत.
लोकसभेतील विजयानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, आत्मविश्वास फक्त काँग्रेसचा नाही तर महाविकास आघाडीचाचं वाढला आहे. विधानसभेसाठीही तीन पक्षांनी एकत्र काम केल्यावरच आत्मविश्वास वाढेल. तीन पक्ष लोकसभा ज्या पद्धतीने लढले त्याच पद्धतीने विधानसभेत लढणार आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात आमच्यामुळेचं काँग्रेसच्या जागा वाढल्या आहेत. त्यांचा आत्मविश्वास वाढला म्हणून एकटे लढणार नाहीत, वरिष्ठ नेते तसा विचार करणार नाहीत. तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय आत्मविश्वास कसा वाढेल. त्यांच्या जागा वाढण्यात आमचा मोठा वाटा आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
हे ही वाचा :
आता दंगल केलीत तर भरून द्या! उत्तराखंडमध्ये कायदा
महागाई कुठे आहे? आयफोन खरेदीसाठी लागल्या रांगा
माजी प्राचार्य संदीप घोष आता नावापुढे डॉक्टर लावू शकणार नाहीत !
हिंदू सणांच्या मिरवणुकीवर दगडफेक आणि ईदच्या मिरवणुकींवेळी भाईचारा
महाविकास आघाडीची जागावाटपासंदर्भात महत्वाची बैठक पार पडणार असून जो जिथं जिंकणारा उमेदवार असेल त्यालाच संधी दिली जाईल, असंही संजय राऊत म्हणाले. काही मतभेद झालेच तर पुन्हा बैठक होईल, वरिष्ठ नेते एकत्र बसतील असंही राऊत म्हणाले. दरम्यान, राज्यात तयार होत असलेल्या तिसऱ्या आघाडीसंदर्भात देखील राऊतांना विचारण्यात आलं. यावेळी संजय राऊत म्हणाले की, तिसरी आघाडी ही केवळ सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी असते. कारण ती विरोधकांची मत फोडते असं ते म्हणाले.