26 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरराजकारणचंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर संजय राऊतांचे 'सव्वा'पसव्य

चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर संजय राऊतांचे ‘सव्वा’पसव्य

Google News Follow

Related

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चंद्रकांत पाटील विरूद्ध संजय राऊत हा सामना चांगलाच रंगला आहे. येणाऱ्या काळात हा कलगीतुरा आणखीन रंगण्याची चिन्हे आहेत. कारण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांना कायदेशीर नोटीस बजावण्याचे जाहीर केेले आहे. पाटील यांच्या विरोधात संजय राऊत मानहानीचा दावा दाखल करणार आहेत आणि तो देखील तब्बल सव्वा रूपयाचा!  संजय राऊत यांच्या या सव्यापसव्याची (नसत्या उठाठेवीची) आता चर्चा सुरू झाली आहे.

काय आहे प्रकरण?
मंगळवार, २१ सप्टेंबर रोजी सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रातून अग्रलेख लिहिला होता. या अग्रलेखातून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांना लक्ष्य करण्यात आले होते. ‘तोंडास फेस कोणाच्या’ या मथळ्याखाली हा अग्रलेख लिहीला होता.

या टीकेला उत्तर देणारा लेख चंद्रकांत पाटील यांनी आज म्हणजेच बुधवार, २१ सप्टेंबर रोजी लिहीला आहे. सामनाच्या संपादकीय पानावर तो छापून आला आहे. या लेखातून चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर चांगलेच टीकास्त्र डागले आहे.

हे ही वाचा:

संयुक्त राष्ट्रसंघ, क्वाड बैठकांसाठी मोदी अमेरिकेला रवाना

कितीही वॉर्ड पुनर्रचना करा, मुंबईसह अन्य महानगरपालिकेत आम्हालाच यश मिळणार

पंजाब राजस्थानच्या सामन्यात बॉलर्सचा बोलबाला

कोण होणार नवे हवाई दल प्रमुख?

या लेखात राऊत यांच्या पत्नीवर झालेल्या पीएमसी घोटाळ्याच्या आरोपांचा संदर्भ पाटील यांनी दिला आहे. पाटलांचा हा वार शिवसेना मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांना चागलाच जिव्हारी लागला आहे. यावरूनच संजय राऊत यांनी येत्या चार दिवसांत चंद्रकांत पाटील यांना कायदेशीर नोटीस पाठवून सव्वा रूपयाचा मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे जाहीर केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा