24 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरराजकारणरत्‍नागिरी:कुणबी समाजाचे नेते प्रकाश मांडवकर भाजपच्या वाटेवर!

रत्‍नागिरी:कुणबी समाजाचे नेते प्रकाश मांडवकर भाजपच्या वाटेवर!

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करणार प्रवेश

Google News Follow

Related

लोकसभेच्या तोंडावर काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसत आहेत.अनेक मंत्री, बडे नेते, कार्यक्रते काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.दरम्यान, राजापूरमधून काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार आहे.काँग्रेसचे कुणबी समाजाचे नेते प्रकाश मांडवकर हे देखील भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे.सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मांडवकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, प्रकाश मांडवकर हे काँग्रेसमधून बाहेर पडणार असून लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली १५ एप्रिलला ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.राजापूर तालुक्याच्या विकासासाठी हा निर्णय घेतल्याचं मांडवकर यांनी स्वत: स्पष्ट केलं आहे. प्रकाश मांडवकर कुणबी सहकारी पतपेढीचे विद्यमान अध्यक्ष आहेत.गेली ३२ वर्षे काँग्रेमध्ये त्यांनी आपली भूमिका बजावली आहे.

हे ही वाचा:

सावंतवाडीतील गंजिफा कलेला आणि लाकडी खेळण्यांना जीआय मानांकन

बेंगळुरू रामेश्वर कॅफे स्फोटातला मास्टरमाइंड कोलकात्यात सापडला!

संदेशखाली प्रकरणी तक्रारी दाखल करण्यासाठी सीबीआयकडून विशेष ई-मेल जारी

स्विगी डिलिव्हरी बॉयने फ्लॅटबाहेरील शूज चोरले!

काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून धडाडीचे कार्यकर्ते म्हणून प्रकाश मांडवकर यांची ओळख आहे.मात्र आता तालुक्याच्या विकासासाठीच आपण भाजपमध्ये जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर मांडवकर यांच्या जाण्याने काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा