सीसीटीव्हीतील दृश्यांच्या आधारावर नवी मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष अन्नू आंग्रे याच्यासह सहा जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रबाळे एका व्हीडिओ गेम पार्लर चालकाला खंडणीसाठी मारहाण केल्याचे हे प्रकरण आहे.
सीसीटीव्हीत या व्हीडिओ गेम पार्लरमधून बाहेर पडलेल्या त्या पार्लरच्या चालकाला अन्नू आंग्रे याने कानशिलात मारल्याचे दिसते आहे. त्याचवेळी आंग्रेचा आणखी एक सहकारी त्या पार्लर चालकाच्या अंगावर धावून जात असल्याचेही त्यात दिसते आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या या अध्यक्षाने केलेल्या या मारहाणीचा सीसीटीव्ही व्हीडिओ सगळीकडे व्हायरल झाला असून त्यावर आता सोशल मीडियात नेटकरी चांगलीच खरडपट्टी काढत आहेत.
नवी मुंबईतील दिघा परिसरात हा पार्लर आहे. हा पार्लर सुरू ठेवायचा असेल तर दरमहिना ५० हजार रुपये द्या नाहीतर जीवे मारण्याची धमकी या राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षाकडून देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्या तक्रारीनुसार आंग्रेसह आणखी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे.
हे ही वाचा:
पायधुनीत होता भारतीय बनावट नोटा छापण्याचा कारखाना !
अष्टपैलू कारकिर्दीची यशस्वी तीस वर्षे
आयसीस काश्मीरकडून गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी
मोदी सरकार मांडणार क्रिप्टोकरन्सीचे विधेयक
ही तक्रार व्हीडिओ गेम पार्लर चालविणाऱ्या श्रीशैल मेलगडे याने केली आहे. दिघ्यातील महालक्ष्मी अपार्टमेंट येथे तो व्हीडिओ गेम पार्लर भाड्याने चालवत आहे. व्हीडिओत दिसत असल्याप्रमाणे १९ नोव्हेंबरला आंग्रेने हे पार्लर चालू ठेवण्यासाठी मेलगडे याच्याकडे दरमहा ५० हजाराची मागणी केली. पवनने ती नाकरल्यानंतर आंग्रेने त्याला कानफटात लगावली. त्यानंतर मेलगडे यांनी त्याची तक्रार केली. त्यानंर रबाळे एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये अन्नूचा भाऊ राहुल आंग्रे, प्रवीण अंचन मंगेश टेमकर, रोशन नाईक, सूरज पटेना परेश भोई अशा सहाजणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेमुळे नवी मुंबईतील गुन्हेगारी पुन्हा डोके वर काढणार अशी भीती आता सर्वसामान्य रहिवासी व्यक्त करू लागले आहेत.