राष्ट्रवादीचे विजय शिवणकर यांचा भाजपात प्रवेश
ज्या पक्षाचा नेता १०० कोटींच्या वसुलीसाठी पकडला जातो, त्या पक्षात राहायचे नाही, असा निर्णय घेत गोंदियातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक वसंत स्मृती, दादर येथे सुरू आहे. त्यात शिवणकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
शिवणकर यांचे वडील हे युती सरकारच्या काळात मंत्री होते. त्यामुळे शिवणकर यांचा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. विजय शिवणकर यावेळी म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार हे ओबीसींवर अन्याय करत आहे.
विदर्भातील ओबीसींचा चेहरा म्हणून शिवणकर कुटुंबीय ओळखले जातात. जवळपास ५ हजार कार्यकर्त्यांसह शिवणकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
दरम्यान, या कार्यकारिणीत प्रारंभी मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्याचा प्रस्ताव मांडला गेला. प्रदेश सचिव प्रमोद जठार यांनी हा ठराव मांडला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, माजी मुख्यमंत्री कल्याणसिंग, भाजपाचे नगरसेवक सुनील यादव, राम बारोट, पुंडलिक दानवे, बालाजी तांबे, साहित्यिक द. मा. मिरासदार, पुनित राजकुमार, तारक मेहता का उल्टा चष्माफेम नट्टूकाका म्हणजेच घनश्याम नायक, लेखक गुरुनाथ नाईक, व्हायोलिन वादक प्रभाकर जोग आदिंना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
हे ही वाचा:
रझा अकादमी, अर्जुन खोतकर नितेश राणेंच्या निशाण्यावर
पूजा ददलानीला तिसरे समन्स; त्यानंतर काय?
वय इथले संपत नाही; १०४ वर्षांच्या आजीने मिळविले ८९ गुण
मोदी सरकारचा मोठा निर्णय; सूर्यास्तानंतरही होणार शवविच्छेदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा प्रस्तावही यावेळी मांडला गेला. शिवसेना ही नरेंद्र मोदी यांचा फोटो लावूनच निवडून आली, असे भाजपा नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यावेळी म्हणाले.