29 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरराजकारणमिसेस मुख्यमंत्री कोरोना पॉजिटीव्ह

मिसेस मुख्यमंत्री कोरोना पॉजिटीव्ह

Google News Follow

Related

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात हाहाकार माजवला आहे. गेले काही दिवस महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. महाराष्ट्रासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. कोरोनाने मुख्यमंत्री निवासस्थानात शिरकाव केला असून मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे या कोरोना पॉजिटीव्ह झाल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचे मंगळवारी समोर आले आहे. सोमवारी रात्री रश्मी ठाकरे यांनी आपली कोरोना चाचणी करून घेतली. या चाचणीत रश्मी ठाकरे या कोरोना पॉजिटीव्ह आढळल्या आहेत. रश्मी यांची प्रकृती ठीक असून त्या ‘वर्षा’ या निवासस्थानी गृह विलीगीकरण अर्थात होम क्वारंटाईन होणार असल्याची माहिती मिळत आहे. रश्मी ठाकरे यांचे चिरंजीव आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे २० मार्च रोजी कोविड पॉजिटीव्ह आढळून आले होते.

हे ही वाचा:

बेअब्रु सरकार, रया गेलेले पवार

भाजपाच्या आरोपांना उत्तरे द्या नवाब मलिक, भ्रमिष्टा सारखे बोलू नका

‘पेन ड्राईव्ह’ घेऊन फडणवीस दिल्लीत

मंगळवारी महाराष्ट्रात २४ तासात २८६९९ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. १३१६५ रुग्ण हे बरे झाले आहेत तर गेल्या २४ तासांत १३२ मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. आजच्या घडीला महाराष्ट्रात २,३०,६४१ इतके कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर आजवर ५३५८९ नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. महाराष्ट्रात होणारी रुग्णवाढ हे अत्यंत चिंताजनक असून केंद्र सरकारतर्फेसुद्धा वेळोवेळी या विषयी महाराष्ट्र सरकारला सावध करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात सातत्याने होणाऱ्या रुग्णवाढीमुळे महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार का? हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निर्बंध कडक करण्यात आले असून काही ठिकाणी नाईट कर्फ्यू आणि लॉकडाऊन करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील नेतृत्वानेही अनेकदा लॉकडाऊन संदर्भातील इशारा दिला आहे.लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय सरकारसमोर आहे आणि लोकांनी नियम पळाले नाहीत तर नाईलाजास्तव तो पर्याय वापरावा लागेल असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचमार्फत सांगण्यात येत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा