रश्मी शुक्लांनीही उघड केला भ्रष्टाचार- परमबीर सिंह

रश्मी शुक्लांनीही उघड केला भ्रष्टाचार- परमबीर सिंह

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचारांची नि:पक्ष चौकशी करावी, पुरावे नष्ट होण्यापूर्वी तातडीने दखल घ्यावी, अशी विनंती परमबीर सिंग यांनी आपल्या याचिकेत केली आहे. महत्त्वाचं म्हणजे परमबीर सिंगांनी पुरावे नष्ट होण्याची भीती व्यक्त करताना, मागील काही दाखले दिले आहेत. या याचिकेत त्यांनी तत्कालिन गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांचा संदर्भ दिला आहे.

रश्मी शुक्ला यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या भ्रष्टाचाराची माहिती गेल्या वर्षी तत्कालिन पोलीस महासंचालकांना दिली होती, असा दावा परमबीर सिंग यांनी आपल्या याचिकेत केला आहे. परमबीर सिंग यांनी रश्मी शुक्ला यांनी सादर केलेल्या अहवालाचीही सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. ज्या अहवालात, बदली आणि पोस्टिंगबद्दल गैरप्रकार झाल्याचा उल्लेख आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; संसदेत खासदारांची मागणी

राज्याने दरोडे घातले तर तपास केंद्र सरकारलाच करावा लागेल

राज्यात सुरू असलेल्या खंडणीखोरीच्या राजकारणातून वेळ मिळाला तर ही कामे होतील

अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी करा

परमबीर सिंग यांनी आपल्या याचिकेत म्हटलंय, “गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराबाबत मी केलेल्या तक्रारीची निप:क्ष, दबावाविना आणि कोणाचीही बाजू न घेता चौकशी व्हावी. पुरावे नष्ट होण्यापूर्वी याची सतत्या तपासणे आवश्यक आहे. अनिल देशमुखांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये त्यांच्या निवासस्थानी एपीआय सचिन वाझे आणि एसीपी संजय पाटील यांच्यासोबत बैठक घेतली होती. या दोघांच्या वरिष्ठांना डावलून ही बैठक झाली होती. त्या बैठकीत महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्याचं टार्गेत अनिल देशमुखांनी दिलं होतं. त्यापूर्वी २४ की २५ ऑगस्ट २०२० मध्ये, रश्मी शुक्ला, ज्या राज्य गुप्तचर यंत्रणेच्या आयुक्त होत्या, त्यांनीही पोलीस महासंचालकांना, पोस्टिंग किंवा बदलीमध्ये अनिल देशमुखांकडून भ्रष्टाचार होत असल्याचं सांगितलं होतं. मात्र त्यावेळी याप्रकरणात अनिल देशमुखांवर कोणतीही कारवाई न करता उलट रश्मी शुक्लांनाच सुनावण्यात आलं होतं. मग गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अनेक तपासामध्ये हस्तक्षेप करुन पोलीस अधिकाऱ्यांना आपल्याला हव्या तशा सूचना देत होते, असा उल्लेख परमबीर सिंग यांनी आपल्या याचिकेत केला आहे.

Exit mobile version