फोन टॅपिंग प्रकरणातील आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला आता महाराष्ट्रात नवी खळबळ उडविण्याची शक्यता आहे. हैदराबाद येथे झालेल्या सीबीआय चौकशीत त्यांनी धक्कादायक माहिती उघड केल्याचा ट्विट भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.
सध्या हैदराबाद येथे सीआयएसएफच्या पोस्टिंगवर असलेल्या शुक्ला यांनी सीबीआयच्या चौकशीत अनेक गौप्यस्फोट केल्याचा ट्विट भातखळकर यांनी आज केला.
राज्य मंत्रिमंडळातील आजी-माजी अनिल, त्यांचे सहकारी आणि एका बड्या नेत्याचे नाव शुक्ला यांनी सीबीआय समोर घेतल्याने आता महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा धुरळा उडणार असल्याचे भातखळकर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा:
आता ठाकरे सरकारने मरण्याची वेळही निश्चित करावी
इस्राएलनंतर आता अमेरिकाही मास्क मुक्तीकडे?
१० राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण
सेहवाग देतोय कोविड रुग्णांना मोफत जेवण
१९८८च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी असलेल्या रश्मी शुक्ला या मार्च महिन्यात चर्चेत आल्या. मुंबईचे तत्कालिन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे भ्रष्टाचारात गुंतलेले असल्याचे पत्र लिहिले होते. त्यानंतर राज्यातील विधान सभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी फोन रेकॉर्डिंगचा ६.१ जीबी डेटा आपल्याकडे असल्याचे सांगून त्यात काही पोलिस अधिकारी आपल्या बदल्यांसंदर्भात देशमुखांच्या आणि गृहविभागाच्या संपर्कात असल्याचा आरोप करण्यात आला होता. याच फोन टॅपिंगसंदर्भातील कागदपत्रेही उघड झाली होती. फडणवीस तेव्हा म्हणाले होते की, जेव्हा शुक्ला या राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त होत्या तेव्हा त्यांनी हे फोन टॅपिंग केले होते. शुक्लांनी केलेल्या या फोन टॅपिंगमुळे महाविकास आघाडी चांगलीच अडचणीत आली होती.
आयपीएस रश्मी शुक्ला यांनी हैदराबाद मध्ये CBI चौकशीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यामध्ये दोन अनिल, त्यांचे चेलेचपाटे आणि एका बड्या नेत्याचे नाव आहे. राज्य सरकारने शुक्ला यांची चौकशी करण्यापूर्वी बाईंनी त्यांचा कार्यक्रम उरकून टाकला आहे.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 28, 2021
त्यानंतर राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आपल्या चौकशी अहवालात स्पष्ट केले होते की, नागिरकांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर काही लोकांचे फोन टॅप करण्याची परवानगी शुक्ला यांनी घेतली होती. कुंटे यांच्या या अहवालानंतर राज्य गुन्हे अन्वेषण खात्याने मुंबई सायबर पोलिसांकडे तक्रार केली. तिथे २६ मार्चला अज्ञात व्यक्तिविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून सदर टॅपिंगप्रकरणी कागदपत्रे उघड केल्याचा आरोप या अज्ञात व्यक्तीवर ठेवण्यात आला आहे. याचसंदर्भात शुक्ला यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. पण करोनाच्या कारणामुळे त्यांनी येणे टाळले. आता शुक्ला यांनी सीबीआयपुढे दिलेल्या खळबळजनक माहितीमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघणार आहे.