शिवसेनेचे उपनेते आणि महाराष्ट्राच्या मिनिमम वेजेस ऍडव्हायझरी कमिटीचे अध्यक्ष रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात हा गुन्हा दाखल झाला असून एका २४ वर्ष तरुणीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिला जबरदस्ती गर्भपात करायला लावल्याचा आरोप कुचिक यांच्यावर आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून सत्ताधारी आघाडीतील आणखीन एक नेता महिला अत्याचाराच्या प्रकरणात अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांनी लग्नाचे आमिष दाखवून एका २४ वर्षीय तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवले. या संबंधातून ही तरुणी गरोदर झाली. पण त्यानंतर कुचिक यांनी त्या तरुणीमागे गर्भपातासाठी आग्रह धरला. ती ऐकत नाही म्हटल्यावर तिला जीवे मारण्याची धमकीही त्यांनी दिली आणि जबरदस्ती तिचा गर्भपात करण्यात आला.
हे ही वाचा:
संजय राऊतांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर
तळपत्या रवी, सूर्या समोर वेस्ट इंडीजचा संघ ढेर
पाकिस्तानी पत्रकारावर आयबी अधिकाऱ्यांचा हल्ला
३ हजार कोटींच्या शिक्षण अर्थसंकल्पात मराठी शाळांसाठी ‘शून्य’
याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या तरुणीने फिर्याद नोंदवली असून या तक्रारीनुसार कुचिक यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीने नोंदवलेल्या फिर्यादीनुसार आरोपी कुचिक यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तरुणीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या संबंधातूनच तरुणी गरोदर राहून नंतर तिला गर्भपातासाठी धमकावण्यात आले.
गेल्या वर्षी पुण्यातून पूजा चव्हाण या तरुणीचे आत्महत्या प्रकरण पुढे आले होते. या प्रकरणात शिवसेना नेते आणि राज्याचे माजी वन मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाले असून त्यांना आपले मंत्रिपद गमवावे लागले होते. संजय राठोड यांनी तरुणी सोबत प्रेम संबंध प्रस्थापित करून नंतर दिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्या घटनेनंतर आता पुन्हा एकदा शिवसेनेशी संबंधित पुढारी रघुनाथ कुचिक यांचे नाव महिला अत्याचाराच्या प्रकरणात पुढे येताना दिसत आहे.