डिसले यांचा शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्याचा मार्ग मोकळा

डिसले यांचा शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्याचा मार्ग मोकळा

ग्लोबल टीचर पुरस्कार सन्मानित रणजितसिंह डिसले यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला जायचे होते त्याकरीता त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात मागील महिन्यात अध्ययन रजेचा अर्ज दिला होता. मात्र, त्यांनी मागितलेली रजा प्रलंबित ठेवण्यात आली होती. या मुद्द्यावरून समाज माध्यमांवर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. मात्र, आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अधिकाऱ्यांना रजा मंजूर करण्याचे निर्देश दिले आहेत.

रणजितसिंह डिसले यांनी त्यांना अमेरिकेत जाऊन पीएचडी करण्याकरिता जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात अध्ययन रजेसाठी अर्ज केला होता. रणजितसिंह डिसले यांनी शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली तेव्हा अध्ययन रजेची परवानगी नाकारत प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी अध्ययन रजेचा अर्ज विहित नमुन्यात आवश्यक असल्याचे सांगत तुम्ही जर अमेरिकेत पीएच. डी करण्यासाठी गेलात तर शाळेचे काय होणार; असा प्रश्न उपस्थित केला होता. एवढी प्रदीर्घ रजा देणे शक्य नाही असेही सांगून यावर उपाय शोधा असे शिक्षणाधिकाऱ्यांनी म्हटले होते.

प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी डिसले हे जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था सोलापूर येथे नियुक्तीच्या ठिकाणी तीन वर्ष गैरहजर असून त्या कालावधीतील पगार घेतल्याचा आरोप केला आहे. सोबत एखादा कर्मचारी जेव्हा देश सोडून जातो, तेव्हा त्यांनी शिक्षण विभागाची परवानगी घेणे गरजेचे असते मात्र कुणालाही कल्पना न देता डिसले गैरहजर राहिलेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित असल्याचेही म्हटले.

हे ही वाचा:

‘आगप्रकरणातील जखमींना दाखल करण्यास नकार देणाऱ्या रूग्णालयांवर कारवाई करावी’

राजपथवर धावणार महाराष्ट्राचा चित्ररथ

झारखंडमध्ये दारू अखंड…घरोघरी दारूचा पुरवठा करणार

फेक न्यूज पसरवणाऱ्या पाकिस्तानी वेबसाईट आणि यूट्यूब चैनल्सवर भारत सरकारची कारवाई

रणजितसिंह डिसले यांनी अध्ययनासाठी मागितलेली प्रदीर्घ प्रलंबित रजा आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मंजूर करण्याचे आदेश दिल्याने डिसले यांना दिलासा मिळाला आहे. त्यांचा उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Exit mobile version