राहुल गांधींविरोधात रणजीत सावरकर यांचा नोंदविला जबाब

राहुल गांधींविरोधात रणजीत सावरकर यांचा नोंदविला जबाब

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या बदनामीकारक विधानामुळे कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात पाऊल कारवाई करण्यात आली आहे. सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पोलिस स्टेशनमध्ये यासंदर्भात जबाब नोंदवला आहे. हे प्रकरण भारत जोडो यात्रे दरम्यान, सावरकरांनावर केलेल्या आक्षेपार्ह टीकेमुळे, राहुल गांधी यांच्यावर सर्व बाजूनी टीका केली जात आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू आणि स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी १७ नोव्हेंबर २०२२ रोजी छत्रपती शिवाजी महाराज पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या पत्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या देशासाठी बलिदानाचा उल्लेख करत राहुल गांधी यांना अटक करण्याची मागणी केली आहे.

तक्रारदार रणजित सावरकर यांच्या फिर्यादीवरून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पोलीस ठाण्यात जबाब नोंदवला आहे. पत्रकारांशी बोलताना स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर म्हणाले की, त्यांच्या पत्रावर पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात येणार आहे. याशिवाय भोईवाड्यातील प्रलंबित प्रकरणातही दिल्ली पोलिसांना नोटीस पाठवण्यात आली आहे. ज्यावर लवकरच कारवाई केली जाईल. मध्य प्रदेशातही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याप्रकरणी एफआरआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्याच्या तक्रारीवरून काँग्रेसचे मीडिया प्रभारी आणि काँग्रेस आयटी सेलच्या प्रमुखाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

आफताबच्या गाडीवर तलवारीने हल्ला; प्रकरण चिघळले

महिला आयोग ही राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहे काय?

बँक दरोडा आणि खुनातील आरोपी अनिल दुबेला अटक

१६९ वर्ष जुन्या भायखळा रेल्वे स्थानकाला मिळाला हा सन्मान

भाजपचे प्रवक्ते पंकज चतुर्वेदी यांच्या तक्रारीवरून भोपाळ गुन्हे शाखेने एफआयआर नोंदवला आहे. यामध्ये मध्य प्रदेश काँग्रेसचे मीडिया प्रमुख पियुष बाबेले आणि काँग्रेस आयटी सेलचे प्रमुख अभय तिवारी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मध्य प्रदेश मधील खांडव्यातील धनगाव येथे राहुल गांधी यांच्या दौऱ्यात घोषणाबाजी करण्यात आली होती.

Exit mobile version