श्रीलंका गेल्या अनेक महिन्यांपासून आर्थिक संकटाचा सामना करत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिला होता. त्यांनतर श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधानांची घोषणा झाली आहे. यूनायटेड नॅश्नल पार्टीचे (यूएनपी) नेते रानिल विक्रमसिंघे हे श्रीलंकेचे नवे पंतप्रधान झाले आहेत.
गुरुवार,१२ मे रोजी सांयकाळी नेते रानिल विक्रमसिंघे यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. रानिल यांनीही यापूर्वीही पंतप्रधानपद सांभाळले आहे. २०१९ साली रानिल यांनी स्वतःच्याच पक्षाच्या दबावामुळे पंतप्रधान पद सोडले होते. रानिल यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आहे.
रानिल विक्रमसिंघे हे १९९४ पासून युनायटेड नॅशनल पार्टीचे प्रमुख आहेत. आतापर्यंत ते चारवेळा श्रीलंकेचे पंतप्रधान झाले आहेत. महिंदा राजपक्षे पंतप्रधान होण्याआधीसुद्धा रानिल हे श्रीलंकेचे पंतप्रधान होते. १९७७ मध्ये ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. १९९३ मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान होण्यापूर्वी रानिल यांनी उपपरराष्ट्र मंत्री, युवा आणि रोजगार मंत्री यासह इतर अनेक मंत्रालये सांभाळली आहेत.
हे ही वाचा:
मंत्रालयसमोर कुटुंबासह आत्मदहनाचा प्रयत्न
ग्यानव्यापीचा सर्वे होणारच! वाराणसी न्यायालयाचा फैसला
…आणि अयुब पटेलशी बोलताना पंतप्रधान मोदी भावूक झाले!
उत्तर प्रदेशात मदरशामध्ये गावे लागणार राष्ट्रगीत
दरम्यान, श्रीलंकेत आर्थिक संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत आहे. अनेक श्रीलंकन नागरिक सरकारविरोधात रस्त्यावर उतरत आहेत. सरकारविरोधी आंदोलनात आतापर्यंत नऊ जणांचा बळी गेला आहे. श्रीलंकेचे माजी पंतप्रधान राजपक्षे यांनी राजीनामा दिल्यांनतर श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी संसदेला सर्वशक्तिमान बनवण्याचे आवाहन केले होते.