रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती

रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती

भारताचा शेजारी देश असलेल्या श्रीलंकेमध्ये आज राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक पार पडली. रानिल विक्रमसिंघे यांची श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे. रानिल विक्रमसिंघे १३४ मतांनी विजयी झाले आहेत. राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत प्रबळ दावेदार मानले जाणारे साजिथ प्रेमदासा राष्ट्रपती पदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रपतीपदासाठी रानिल विक्रमसिंघे विरुद्ध डलास अलाहाप्पेरुमा यांच्यात चुरस होती.

रानिल विक्रमसिंघे यांच्या विरुद्ध एसएलपीपी खासदार डलास अलाहाप्पेरुमा हे सत्ताधारी पक्षाचे उमेदवार होते. विक्रमसिंघे यांनी डलास अलाहाप्पेरुमा यांचा पराभव केला असून ते आता श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती बनले आहेत.

श्रीलंका सध्या भीषण आर्थिक संकटाचा सामना करत आहे. तत्कालीन राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी पलायन करून राजीनामा दिल्यानंतर रानिल विक्रमसिंघे यांच्याकडे कार्यवाहक राष्ट्रपतीपदाची जबाबदारी होती. पंतप्रधान असताना त्यांच्यावर कार्यवाहक राष्ट्रपतीपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर आज राष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडली. यामध्ये रानिल विक्रमसिंघे यांनी १३४ मतांनी विजय मिळवला आहे.

हे ही वाचा:

बँक कर्मचाऱ्यानेच मारला डल्ला; बँकेतून १२ कोटी २० लाख रुपयांची रोकड लंपास

मंत्रिपद देतो म्हणत भामट्यांनी आमदारांकडे मागितले १०० कोटी

राहुल शेवाळे शिवसेनेचे गटनेते, तर भावना गवळी मुख्य प्रतोद

नुपूर शर्मांची हत्या करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी नागरिकाच्या मुसक्या आवळल्या

श्रीलंकेतील २२५ खासदारांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत मतदान केलं. विजयासाठी उमेदवाराला ११३ हून अधिक मतं मिळवणं आवश्यक होतं. या निवडणुकीत रानिल विक्रमसिंघे यांनी १३४ मतं मिळवत बहुमत मिळवले आणि राष्ट्रपतीपदी विराजमान झाले. श्रीलंकेच्या संसदेत आज ४४ वर्षात प्रथमच थेट राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका झाल्या. रानिल विक्रमसिंघे यांच्याशिवाय दुल्लास अल्हप्पारुमा आणि अनुरा कुमारा दिसानायके हे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात होते.

Exit mobile version