राणांच्या समर्थनार्थ राणे

राणांच्या समर्थनार्थ राणे

राणा दाम्पत्यांनी उद्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा लक्षात घेऊन मातोश्रीवर जाण्याचा निर्णय मागे घेतला आहे. मात्र तरीही शिवसैनिक राणा दाम्पत्यांच्या इमारतीसमोरून जाण्यास तयार नाहीत. यामुळे, भारतीय जनता पार्टीचे नारायण राणे पत्रकार परिषद घेऊन शिवसैनिकांना आव्हान केले आहे. ते म्हणाले, राणा दाम्पत्यांना जर अडवलं, तर मी स्वतः जाऊन त्यांना बाहेर काढेन, असे आव्हान राणे यांनी दिले आहे. एका तासाच्या आत राणा दाम्पत्य बाहेर येतील असा इशाराही राणे यांनी दिला आहे.

हजारो शिवसैनिक मातोश्री आणि राणा दाम्पत्यांच्या इमारतीसमोर जमले असल्याचे शिवसेना नेत्यांनी सांगितले होते. मात्र, नारायण राणे यांनी ही माहिती दिली की, अखंड महाराष्ट्रातून फक्त २३५ शिवसैनिक मातोश्रीवर जमले होते. तर राणांच्या इमारतीजवळ फक्त १२५ शिवसैनिक जमले होते. अखंड महाराष्ट्र बोलता आणि त्यातले दोन दिवसांत फक्त २३५ च शिवसैनिक जमले, असा टोला राणेंनी लगावला आहे. बाळासाहेब ठाकरेंनी एक हात वर केला तरी लाखो शिवसैनिक जमा होत होते, असेही राणे यांनी सांगितले आहे.

राणा दाम्पत्य जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना बाहेर जाऊ देणार नाही, असा पवित्रा शिवसैनिकांनी घेतला. यावरून नारायण राणेंनी शिवसैनिकांना आणि पोलिसांनाही खडसावले आहे. राणे म्हणाले, शिवसेनेला मुख्यमंत्री पक्षाचे आहेत की नाही याचे भान राहिलेले नाही. महाराष्ट्रात सरकार आहे असे वाटतच नाही आहे. माफी मागायला सांगून शिवसेना काय सिद्ध करत आहे. पोलीस असताना, हे सर्व कसे घडत आहे, असा सवाल राणेंनी केला आहे. राणा दाम्पत्यांना सुरक्षित बाहेर काढा; अन्यथा मी स्वतः जाऊन त्यांना बाहेर काढीन असा इशारा राणेंनी दिला आहे.

हे ही वाचा:

दिल्ली पोलीस आयुक्तांनी त्या आरोपींना तीन तास शेकवून काढले

हनुमानच शिवसेनेला धडा शिकवेल

‘राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा’

‘राणांच्या घरावर हल्ला करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनीच दिले’

मातोश्रीवर शिवसैनिक का जमले आहेत, की मातोश्रीला काही भीती आहे कोणी काही घेऊन जाईल राणेंनी अशी टीका केली आहे. तसेच ते पुढेच म्हणाले, राज्यात आम्हाला राष्ट्रपती राजवट लागू करण्याची गरज नाही. जी राज्यात स्थिती चालली आहे त्यावरून राष्ट्रपती राजवटीचे महत्त्व असल्याचे स्पष्ट होते. आता शिवसेनेने तलवार सोडून गदा हातात घेतला आहे. पुढे आता झाडू हातात घेतील, अशी खोचक टीका राणेंनी केली आहे.

Exit mobile version