राणे बंधूंनी पुन्हा घेतला वरूण सरदेसाईचा समाचार

राणे बंधूंनी पुन्हा घेतला वरूण सरदेसाईचा समाचार

युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांनी नितेश राणे यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे म्हटले होते. त्याचा खरपूस समाचार घेत नितेश राणे यांनी वरुण सरदेसाईंवर सडकून टिका केली आहे.

याबद्दल ट्वीट करताना नितेश राणे यांनी वरूण सरदेसाईला लक्ष्य केले आहे. यात त्यांनी शादी डॉट कॉमला टॅग केले आहे. त्यासोबतच त्यांनी ‘हा लग्नासाठी अतिशय उत्सुक मुलगा आहे म्हणूनच तो पत्रकार परिषद घेऊन आपल्या घराण्याबद्दल सांगत आहे. मी तुम्हाला याला मदत करण्याची विनंती करतो.’ असे म्हटले आहे.

हे ही वाचा:

कोणाच्या सांगण्यावरून सचिन वाझेने स्फोटकांनी भरलेली गाडी ॲंटिलियासमोर ठेवली

भारताला ‘लायसन्स राज’चा धोका- पॉल क्रुगमन

शरद पवारांनीच अनिल देशमुखांची हकालपट्टी करावी- किरीट सोमैय्या

त्याबरोबरच त्यांचे बंधू निलेश राणे यांनी देखील वरूण सरदेसाईवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी सरदेसाईचे ट्वीटमधून वाभाडे काढत ‘ठाकरेंचा नातेवाईक वरून खालून सरदेसाई सारखा बेवडा, जूगारडा, मटका छाप म्हणतो अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार पण मुळात त्यासाठी अब्रू असावी लागते. ठाकरे म्हणे सुसंस्कृत, ह्यापेक्षा मोठा विनोद नाही. ठाकरेंचा सुसंस्कृतपणा ऐकायचा असेल तर जयदेव ठाकरेंना किव्हा सोनू निगमला विचारा.’ असे ट्वीट केले आहे. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा ट्वीट करून शिवसेनेला लक्ष्य केले आहे. ‘ठाकरे आणि त्यांच्या कुत्र्यांनी ज्यास्त नाटक केलं तर ठाकरे आणि सोनू निगमची स्टोरी अख्या महाराष्ट्राला सांगून टाकणार.’ असे त्यांनी म्हटले आहे.

Exit mobile version