राणा दाम्पत्यांच्या केसची मुंबईतील वांद्रे न्यायालयाने सुनावणी झाली. न्यायालयासमोर सरकारी वकील प्रदीप घरत आणि राणा दाम्पत्यांचे वकील रिझवान मर्चट यांनी युक्तिवाद केला. न्यायालयात प्रदीप घरत यांनी राणा दाम्पत्यांच्या सात दिवसाची कोठडीची मागणी केली होती. मात्र राणा दाम्पत्यांचे वकील मर्चट यांनी ही केसच बेकायदेशीर असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार खंडपीठाने निकाल देत राणा दाम्पत्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
निकालानंतर माध्यमांनी वकील रिझवान मर्चट यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी राणा दाम्पत्यांची केसच बोगस असल्याचे मर्चट यांनी सांगितले. ते म्हणाले, खार पोलीस ठाण्यात राणा दाम्पत्यांविरोधात फक्त १५३ अ नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांच्यावर कलम ३५३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. जर कलम ३५३ राणा दाम्पत्यांविरोधात दाखल करायचा होता तर पहिल्या एफआयआर मध्ये का दाखल केला नाही? असा सवाल मर्चट यांनी केला आहे. यावरून पोलिसांचा अन्यायकारक आणि अप्रामाणिकपणा समोर आला आहे,असंही मर्चट म्हणाले आहेत.
हे ही वाचा:
राणा दाम्पत्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
‘मन की बात’ मधून पंतप्रधानांनी विचारले ‘हे’ सात प्रश्न
कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच मोदी काश्मीरमध्ये
‘याआधी झुंडशाही राज्यात कधी पहिली नव्हती’
मर्चट पुढे म्हणाले, न्यायालयात सरकारी वकील प्रदीप घरत यांनी युक्तिवाद कलम १२४ ‘अ’ (द्वेष पसरवणे) नुसार केला. जेव्हा घरत यांना राणा दाम्पत्यांनी कोणते द्वेष पसरवण्याचे वक्त्यव्य केले विचारले असता, ते उत्तर देऊ शकले नाहीत. त्यांनी विचारपूर्वक दोन एफआयआर राणा दाम्पत्यांविरोधात दाखल केले. कारण १५३ अ नुसार राणा दाम्पत्यांना जामीन मिळू शकत होता, म्हणून कलम ३५३ सुद्धा त्यांच्यावर लावण्यात आल्याचे मर्चट म्हणाले. राणा दाम्पत्य फक्त हनुमान चालीसा पठण करण्यास आले होते. आणि हे कायद्याने चुकीचे नाही, त्यामुळे ही संपूर्ण केसच बोगस असल्याचे मर्चट म्हणाले.