खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर राजद्रोहाचा आरोप आहे. त्यामुळे राणा दाम्पत्य सध्या तुरुंगात आहे. न्यायालयाने राणा दाम्पत्याना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यांनतर राणा दाम्पत्याने जामिनासाठी अर्ज केला. आज, २ मे रोजी राणा दाम्पत्यांच्या या जामीन अर्जावर सुनावणी होती. मात्र आज निकालाचे लिखाण पूर्ण होऊ न शकल्याने आणि उद्या ईदची सुट्टी असल्याने राणा दाम्पत्याच्या जामिनावर आता बुधवार, ४ मे रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याचा न्यायालयातील मुक्काम आणखी दोन दिवस वाढला आहे.
बुधवार, ४ मे रोजी ११ वाजता राणा दाम्पत्यांच्या जामिनाचा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले. राणा दाम्पत्य मातोश्रीवर हनुमान चालीसा पठणासाठी मुंबईत दाखल झाले होते. त्यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी राणा दाम्पत्यांच्या इमारतीसमोर राडा केला होता. राणा दाम्पत्यांविरोधात घोषणाबाजी शिवसैनिकांनी केली होती. त्यानंतर राणा दाम्पत्यांना कलम १५३ ‘अ’ च्या अंतर्गत दोन समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य करण्यावरून त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांनतर त्यांच्यावर कलम ३५३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हे ही वाचा:
महाराष्ट्र दिनी उत्तर भारतीय संघाकडून रक्तदान
धक्कादायक! मुंबई विद्यापीठाच्या लॉ अभ्यासक्रमाचा पेपर केला ‘सोप्पा’
वीजसंकटावर गृहमंत्री अमित शहा उचलणार पाऊल
बर्लिनमध्ये लहान मुलीच्या चित्राचे केले पंतप्रधान मोदींनी कौतुक
त्यांनतर पुन्हा राणा दाम्पत्यांवर १२४ अ कलमानुसार, राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावर आज सुनावणी होणार होती. मात्र, न्यायालयाची वेळ संपल्याने आणि युक्तीवादाचे वाचन पूर्ण होऊ न शकल्याने दाखल जामिन अर्जावरील सुनावणी आता बुधवारी सकाळी पहिल्या सत्रात होणार असल्याचे सांगितले जात आहे.