राणा दाम्पत्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर लगेचच राणा दाम्पत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आम्हला कोणतीही शारीरिक इजा झाली तर, याला शिवसेना नेते संजय राऊत, अनिल परब आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार राहतील. तसेच, राणा दाम्पत्यांनी संजय राऊतांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्याने त्यांचीसुद्धा तक्रार दाखल केली आहे.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना खार पोलीसांनी अटक केली. त्यांनतर राणा दाम्पत्यांनी शिवसेनेवर तक्रार दाखल केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते अनिल परब आणि संजय राऊत तसेच शिवसेनेवर ही तक्रार आहे. संजय राऊतांनी केलेल्या चिथावणी खोर वक्त्यव्यावर तक्रार केली आहे. राऊतांनी नवनीत राणांविरोधात आक्षेपार्ह वक्त्यव्य केले होते. तसेच आज दिवसभर शिवसैनिक राणा दाम्पत्यांच्या इमारतीसमोर घोषणाबाजी करत आंदोलने केली. राणा दाम्पत्यांच्या इमारतीत घुसण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला त्याचीही तक्रारीत राणा दाम्पत्यांनी नोंद केली आहे.
हे ही वाचा:
‘राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा’
‘राणांच्या घरावर हल्ला करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनीच दिले’
राणा दाम्पत्यांच्या इमारतीबाहेर शिवसैनिकांनी रुग्णवाहिका आणली होती याचीही तक्रारीत राणा दाम्पत्यांनी नोंद केली आहे. तसेच आम्हला शारीरिक जीवितहानी होईल अशी परिस्थिती शिवसेनेने निर्माण केली. त्यानुसार जर आमच्या जीवाला काही धोका निर्माण झाल्यास याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसैनिक जबाबदार राहतील, अशी तक्रार राणा दाम्पत्यांनी केली आहे.