‘मातोश्री’ दर्शनासाठी राणा दाम्पत्य मुंबईत

‘मातोश्री’ दर्शनासाठी राणा दाम्पत्य मुंबईत

मागील काही दिवसांपासून हनुमान चालीसा पठण यावरून राजकीय वातावरण तापले आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवास स्थानासमोर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार असल्याचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे आज राणा दांपत्य शुक्रवारी, २२ एप्रिल रोजी मुंबईत दाखल झाले आहेत. आज सकाळी विमानाने ९.३० ला मुंबईत राणा दांपत्य दाखल झाले आहेत.

दरम्यान, शिवसैनिक हे राणा दांपत्यला अडवण्यासाठी सीएसटी स्टेशनवर गेले होते. मात्र, राणा दांपत्य हे विमानाने मुंबईत दाखल झाले आहेत,त्यामुळे शिवसैनिक अजूनच आक्रमक झाले. स्टेशन वर राणा दांपत्य दिसले नाहीत म्हणून खार वेस्ट १४ रोड येथील व्हिला बिल्डिंगमधील घरी राणा दांपत्य आलेत का याची पाहणी कारण्यासाठी ही शिवसैनिक दाखल झाले होते.

परंतु, राणा दांपत्य हे खार येथील नंदगिरी गेस्ट हाऊसवर थांबले आहेत. त्यामुळे त्याची माहिती मिळताच शिवसैनिक नंदगिरी गेस्ट हाऊसवर जमले असून तिथे घोषणाबाजी करण्यास सुरवात केली आहे. राणा दांपत्य यांनी माध्यमांना ते विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईला जाणार होते अशी माहिती दिली होती. या दाम्पत्याला रोखण्यासाठी शिवसेनने आक्रमक पवित्रा उचलला होता. त्यामुळे विदर्भ एक्स्प्रेसने येण्याचे सांगून थेट विमानाने राणा दांपत्य मुंबईला दाखल झाले आहेत.

हे ही वाचा:

आजपासून उदगीरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

सिग्नलला फडका बांधून देवगिरी एक्स्प्रेसवर दरोडा

CISF जवानांच्या बसवर दहशतवाद्यांचा हल्ला; एका जवानाला वीरमरण

बोरिस जॉन्सन ‘बाबा बुलडोझर’ का बनले?

राणा दाम्पत्य अचानक मुंबईत दाखल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, शनिवार,२३ एप्रिल रोजी ते मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालिसा पठण करणार आहेत.

Exit mobile version