खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या मुंबईतील खार येथील घरात अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे, असा दावा पालिकेने केला होता. त्यावेळी राणा दाम्पत्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर शनिवार, २१ मे रोजी पालिकेने पुन्हा एकदा राणा दाम्पत्याला नोटीसद्वारे अल्टिमेटम देण्यात आले आहे.
मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना राणा दाम्पत्यानच्या खार येथील निवासस्थानी नियमांचे भंग करुन बांधकाम केल्याचे आढळले होते. निवासस्थानाचा अधिकृत आराखडा मंजूर झाला होता. परंतु त्याच्याव्यतिरिक्त बांधकाम का केले? असा सवाल पालिकेने राणा दाम्पत्यला केला आहे. त्यानंतर राणा दाम्पत्याला सात दिवसांची कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती. परंतु या नोटीसची मुदत आता समाप्त झाली असून कारणे दाखवा नोटीसीला राणा दाम्पत्यांनी दिलेली उत्तरे अमान्य करत पुन्हा नोटीस पाठवले आहे. अनधिकृत बांधकाम ७ ते १५ दिवसांत पाडा, अन्यथा महापालिकेला कारवाई करावी लागेल, असा अल्टिमेटमही नोटीसद्वारे पाठवण्यात आला आहे.
हे ही वाचा:
नवाब मलिकांचे दाऊदच्या टोळीशी थेट संबंध
शिवलिंगाबद्दलची आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर प्राध्यापकाला अटक
२०२० चे प्रकरण उकरून काढत, केतकी चितळेंवर कारवाई
मुंबई विमानतळावर मुंबई- बंगळुरू विमानाचे आपत्कालीन लॅन्डिंग
दरम्यान, राणा दाम्पत्यांनी मातोश्रीवर हुनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला होता. त्यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी राणा दाम्पत्यांच्या इमारतीबाहेर राडा, आंदोलन केले होते. त्यांनतर राणा दाम्पत्यांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या दरम्यान पालिकेने त्यांच्या राहत्या घरात अनधिकृत बांधकाम असल्याचे सांगत नोटीस पाठवली होती.