टाळेबंदीमध्ये वाढली अनधिकृत बांधकामे

टाळेबंदीमध्ये वाढली अनधिकृत बांधकामे

मालाड-मालवणी मध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर आता अवैध बांधकामांची चर्चा मुंबईमध्ये जोरात होऊ लागलेली आहे. मुंबईमधील अवैध बांधकामांना सर्वाधिक परवानगी ही कोरोना काळात दिली गेल्याचे आता समोर आलेले आहे. गेल्या सव्वा वर्षात अनधिकृत बांधकामासंदर्भात तब्बल १३ हजारांपेक्षा जास्त तक्रारींची नोंद झालेली आहे. यामध्ये जवळपास साडेतीन हजार तक्रारी दुबार आहेत. सर्वाधिक अवैध बांधकामे मुंबईतील चेंबूर एम., चेंबूर एम. पश्चिम, कुर्ला एल., विक्रोळी एस, कांदिवली आर – उत्तर या ठिकाणी खुलेआम झालेली आहेत. गेल्यावर्षी टाळेबंदीच्या दरम्यान कुठलेही बांधकाम सुरू नव्हते. परंतु त्यानंतर मात्र अनधिकृत बांधकामांना पेव फुटल्याचा आकडाच आता समोर आलेला आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्रातील हे नेते मोदी मंत्रिमंडळात निश्चित?

लसीचे दोन्ही डोस घेतल्यावर मृत्यूचा धोका ९५ टक्के कमी

एकनाथ खडसेंचा जावई ईडीच्या ताब्यात

ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचं ९८ व्या वर्षी निधन

टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर कामाला वेग आला, त्याच दरम्यान अवैध बांधकामे जोरात सुरु झाली. आजच्या घडीलाही अवैध बांधकामे सुरूच आहेत. मार्च २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीमध्ये पालिकेकडे १३ हजारांपेक्षा जास्त तक्रारी अवैध बांधकामाच्या आलेल्या आहेत. वर्षभरात एकूण ९ हजार बांधकामांची नोंद याठिकाणी झालेली आहे. अनधिकृत झोपड्यांच्या उंची तर दोन मजल्यांच्या घरांइतक्या होईपर्यंत प्रशासन झोपलेले असते का असाच प्रश्न पडतो.

पूर्व उपनगरातील कुर्ला, गोवंडी, मानखुर्द या भागांतून सर्वाधिक अवैध बांधकामांच्या तक्रारी समोर आल्या आहेत. जवळपास १२०० ते ३२५० तक्रारी या भागातून आलेला आहे. कुर्ला परिसरातील साकीनाका भागामध्येही सर्वाधिक बेकायदा बांधकामे असल्याचे समोर आले आहे. यामध्ये फरसाण कारखाना, अवैध गॅरेज, गोदामे यांची संख्या मोठी आहे. अनधिकृत बांधकामांना राजाश्रय हा पालिकेचा आहे हे सत्य आता सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळेच मुंबईसारख्या शहरात केवळ व्होट बॅंकेचा आसरा म्हणूनही अनधिकृत इमारती उभ्या राहात आहेत.

Exit mobile version