29 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरराजकारणरमेश बैस नवे राज्यपाल.. कोश्यारींचा राजीनामा मंजूर

रमेश बैस नवे राज्यपाल.. कोश्यारींचा राजीनामा मंजूर

देशभरात १३ राज्यांमध्ये राज्यपालांची नव्याने नियुक्ती

Google News Follow

Related

विद्यमान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर झाला आहे. रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भगतसिंग कोश्यारी यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा स्वीकारला आहे. बैस हे झारखंडचे विद्यमान राज्यपाल आहेत. त्याच बरोबर देशभरात १३ राज्यांमध्ये राज्यपालांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच अनेक राज्यांमध्ये नवीन राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भगतसिंग कोश्यारी यांनी यापूर्वीच महाराष्ट्राचे राज्यपालपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि त्यांना निवृत्त जीवन जगायचे होते. यामागचे कारण स्पष्ट करताना कोश्यारी म्हणाले होते की, आता त्यांना आपले उर्वरित आयुष्य वाचन, लेखन आणि इतर फुरसतीच्या कामांमध्ये घालवायचे आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राजभवनाकडून एक निवेदनही जारी करण्यात आले होते, ज्यामध्ये कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदींकडून सर्व राजकीय जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर महाराष्ट्राचा नवा राज्यपाल कोण होणार याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती.

आता झारखंडच्या राज्यपालपदाची जबाबदारी सीपी राधाकृष्णन यांच्याकडे देण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राधाकृष्णन माथूर यांचा लडाखच्या नायब राज्यपालपदाचा राजीनामा स्वीकारला आहे.महाराष्ट्राचे राज्यपाल तसेच लडाखचे नायब राज्यपाल राधा कृष्णन माथूर यांचे राजीनामे स्वीकारण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

मुंबईवरून ‘एक्सप्रेस वे’ने २४ नाही तर १२ तासांत गाठा दिल्ली

राष्ट्रवादीला अजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्याचे डोहाळे.. पण शरद पवार म्हणाले

फिरकीच्या जाळ्यात कांगारू फसले; भारताचा डावाने विजय

महान दूरदर्शी व्यक्तिमत्व पंडित दीनदयाळ उपाध्याय

गुलाबचंद कटारिया यांना आसामचे राज्यपाल, माजी केंद्रीय मंत्री शिव प्रताप शुक्ला हिमाचल प्रदेशचे राज्यपाल करण्यात आले आहे. त्याचबरोबर राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांना बिहारचे राज्यपाल बनवण्यात आले आहे. आतापर्यंत ते हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते. तर बिहारचे विद्यमान राज्यपाल फागू चौहान यांना मेघालयचे राज्यपाल बनवण्यात आले आहे.

या राज्यांमध्येही बदलले राज्यपाल आणि उपराज्यपाल

१. लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक आता अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल

२. उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सदस्य लक्ष्मण प्रसाद आचार्य आता सिक्कीमचे राज्यपाल

३. तामिळनाडू भाजपचे माजी अध्यक्ष सीपी राधाकृष्णन आता झारखंडचे राज्यपाल आहेत

४. भाजप कार्यसमितीचे सदस्य गुलाबचंद कटारिया आता आसामचे राज्यपाल आहेत

५. भाजप नेते शिव प्रताप शुक्ला आता हिमाचल प्रदेशचे राज्यपाल

६. निवृत्त ब्रिगेडियर डॉ. बी.डी. मिश्रा, अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल, आता लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर

७. सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर आता आंध्र प्रदेशचे राज्यपाल आहेत.

८. एल.ए. गणेशन, मणिपूरचे राज्यपाल, आता नागालँडचे राज्यपाल

९. फागू चौहान, बिहारचे राज्यपाल, आता मेघालयचे राज्यपाल

१०. राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल, आता बिहारचे राज्यपाल

११. आंध्र प्रदेशचे राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन आता छत्तीसगडचे राज्यपाल

१२. छत्तीसगडचे राज्यपाल अनुसुईया उईके आता मणिपूरचे राज्यपाल

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा