रामदास कदमांचा संजय राऊतांवर हल्लाबोल
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या घरी आज ईडीची कारवाई सुरु आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी ट्विट करत याच्याशी माझा काहीही संबंध नाही असे म्हणत त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेतली आहे. यावरून शिवनेचे नेते रामदास कदम यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे. ‘संजय राऊत यांनी बाळासाहेबांची नाही तर शरद पवारांची शपथ घ्यावी, अशी बोचरी टीका रामदास कदम यांनी राऊतांवर केली आहे.
संजय राऊत यांनी शिवसेनेपेक्षा शरद पवारांची जास्त काम केलं आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वात जास्त निधी राष्ट्रवादीला मिळत होता. त्यामुळे संजय राऊत यांनी बाळासाहेबांपेक्षा शरद पवार यांची शपथ घ्यावी, अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे आजारी असताना अजित पवारांना रान मोकळं मिळालं. कर नाही तर डर कशाला? निधी वाटपात अन्याय होत असताना संजय राऊत गप्प का होते? शिवसेना फुटत असताना संजय राऊत गप्प का होते? त्यामुळे राऊतांची भूमिका महाराष्ट्राला कशी पटेल? आता तरी राऊत बोलवणं थांबवणार का?असे प्रश्न देखील कदमांनी उपस्थित केले आहेत.
हे ही वाचा:
…ईडीचे अधिकारी घरी आले की सोबत घेऊनच जातात!
मिराबाई चानूने राष्ट्रकुल स्पर्धेत ‘उचलले सोने’
अविनाश भोसलेचे ‘हेलिकॉप्टर’ सीबीआयने आणले जमिनीवर
तिस्ता सेटलवाड आणि श्रीकुमार यांना दिलासा नाहीच
पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांच्या घरी ईडीचं पथक दाखल झालं आहे. ईडीने अनेक वेळा संजय राऊत यांना समन्स पाठवले होते. पण संजय राऊत चौकशीसाठी हजर झाले नाहीत. अखेर आज सकाळी ईडीचं पथक संजय राऊत यांच्या घरी दाखल झालं. गेल्या चार ते पाच तासापासून इडीच पथक संजय राऊत यांच्या घरी आहे.