सध्या राज्यात ‘वेदांता- फॉक्सकॉन’ प्रकल्पावरून राजकारण चांगलेच तापले आहे. याप्रकरणी शिवसेना आमदार रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी विनंती रामदास कदम यांनी केली आहे. तसेच, यावेळी रामदास कदम यांनी शिवसेनवर टीकास्त्र डागले आहे.
‘वेदांता- फॉक्सकॉन’ कंपनीने महाराष्ट्रात होणारा प्रकल्प गुजरातमध्ये नेला. यावरून शिंदे फडणवीस सरकारवर टीका होत असून, याबद्दल रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, काल आलेल्या सरकारवर टीका करत आहेत. नवीन सरकारवर टीका कशी केली जाऊ शकते. दोन वर्ष मविआ सरकार होते, त्यांना यावरून टीका करण्याची गरज नाही आहे. इतका मोठा प्रकल्प गुजरातला कसा गेला. आता पुन्हा आपण तो प्रकल्प आणू शकतो का यासह अनेक गोष्टींची सखोल चौकशी करण्याची विनंती मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करणार आहे.
पुढे रामदास कदम म्हणाले, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे लक्ष देण्यापेक्षा महाराष्ट्राचा विकास कसा होईल याकडे आमचं लक्ष आहे. ठाकरे कुटुंबीय त्यांचे काम करतील आम्ही आमचे काम करू. ठाकरे यांचं सध्या जिवंत कसं राहता याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे ठाकरे यांच्याकडे लक्ष न देता महाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष देत आहोत. जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम करत आहोत. आदिवासी, धनगर, बौद्ध समाजाला न्याय देणार असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा:
आरोग्य विभागाची नावे हिंदीसह उर्दूमध्ये लिहण्यास सांगणारा अधिकारी निलंबित
महाराष्ट्रातल्या या पक्षांवर निवडणूक आयोगाची कारवाई
अयोध्येतील राम मंदिरावर १८०० कोटी खर्च होणार
इलेक्ट्रिक स्कूटर रिचार्जिंग युनिटला लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू
तसेच दसरा मेळाव्याबद्दल बोलताना रामदास कदम म्हणाले, बाळासाहेबांनी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करण्याची शिकवण दिली आहे. हेच बाळासाहेंबाचे विचार जेतेपर्यंत पोहचवणे आमचं काम त्यामुळे आमचा शिवतीर्थावर मेळावा होणं गरजेचं आहे. खऱ्या शिवसेनेचा शिवतीर्थावर मेळावा व्हावा अशी आमची इच्छा असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले आहे.