पक्ष आणि चिन्ह गमावल्यावर उद्धव ठाकरे यांची आज खेडमध्ये पहिलीच सभा आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेआधी , कदम यांच्या बालेकिल्ल्यात आज उद्धव ठाकरे सभा घेत आहेत त्या पार्श्वभूमीवर रामदास कदम आज पत्रकारांशी संवाद साधत होते.
ते म्हणाले की, खेड हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आजही आहे आणि उद्याही असेल. उद्धव ठाकरे येत आहेत म्ह्णून मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई , रायगड रत्नागिरी जिल्ह्यातून, प्रचंड तयारी चालली आहे लोक आणण्याची. जणू काही शिवाजी पार्कवर दसऱ्याची जाहीर सभाच आहे खेडला. म्हणजे रामदास कदमांचा किती मोठा धसका घेतला आहे हे ह्यावरून स्पष्ट होते. बाहेरची लोक आणून इथे राजकारण होत नसते ना. ते भाषणे देतील, लोक ऐकतील आणि निघून जातील ना, इथले स्थानिक किती आहेत. स्थानिक किती आहेत दोन चार टक्के तरी आहेत का? नाही.
रामदास कदम म्हणाले की, मला त्याची काळजी नाही. त्यांनी यावे, बोलावे आणि जावे आम्ही त्याची नोंद पण घेत नाही पण या सगळ्याला उत्तर १९ मार्चला दिले जाईल. आम्ही सभा घेत आहोत त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. गुलाब पाटील आहेत, शंभूराजे देसाई आहेत, आमचे महाडचे आमदार गोगावले आहेत. आणि त्याच ठिकाणी व्याजासह त्यांना त्याची उत्तरे मिळतील. पुढे पत्रकारांनी संजय कदम यांच्या बद्दल प्रश्न विचारल्यावर किती, पर्यावरण खात्यावर जो पैसा आला त्या पैशावर योगेश कदम आमदार झालेत.
त्यांची ओळख गावठी आमदार म्हणून होते. ते विधिमंडळात पाच वर्षात किती वेळा बोलले त्याची माहिती काढा म्हणजे तुम्हाला कळेल. मुळात पर्यावरण खात्याला बजेटच नव्हते आणि ज्या खात्याला बजेटच नव्हते ते खाते कधीच नव्हते. पर्यावरण खाते हे वेगळे कधीच नव्हते वन आणि पर्यावरण खाते असायचे आणि मला काहीतरी द्यायला पाहिजे म्हणून उद्धव ठाकरे यांनी मला हे खाते दिले. त्याला बजेट शून्य होते. पण अनेक ठिकाणी जे गाळ काढण्याचे काम होते ते मुनगंटीवार , देवेंद्रजींना सांगून निधी घेतला आणि मी ती काम केली, असेही रामदास कदम म्हणाले.
हे ही वाचा :
९ मार्चपासून आम्हाला घालू द्या हिजाब! कर्नाटक सरकारचे हे पाऊल…
विमानातील लघुशंकेचे नवे प्रकरण आले समोर…आता एका विद्यार्थ्याने केले कृत्य
सुप्रिया सुळे मांसाहार करून देवदर्शनाला , शिवतारे यांच्या पोस्टमुळे रंगली चर्चा
मनसे नेते संदीप देशपांडेच्या हल्लेखोरांचा ठाण्यांत शोध
आगामी निवडणुकीत आम्ही लढणार आणि रामदास कदम यांचा पराभव करणार असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला तेव्हा कदम म्हणाले कि, तो लढणार आणि पन्नास हजार मतांनी संजय कदम पडणार. लिहून ठेवा. रामदास कदम अख्ख्या महाराष्ट्रात गेलेत , अख्ख्या महाराष्ट्राचा लढा मी लढलो आहे तेव्हा माझ्या मुलाला कसे निवडून आणायचे मला माहित आहे ना त्यांची कामे चांगली झाली आहेत. कामे अतिशय सुंदर छान कामे चालू आहेत. जवळ जवळ ५० कोटी, त्यांच्या भाषेत ५० खोके विकास कामांसाठी योगेश कदम यांना एकनाथ शिंदे यांनी दिली आहेत. लोकांना विकास कामे मिळतात लोके पाठीशी राहतात, लोकांना अजून हवे काय?
हे खोके खोके म्हणतात ना उद्धवजींनी अडीच वर्षात किती दिले आहेत खोके त्यांनी सांगावे ना आमदार निवडणुकीची आम्हांला अजिबात काळजी नाही ही राष्ट्रवादीची जागा होती ती खेचून आम्ही भगवा फडकावला आहे, असे सांगून कदम म्हणाले की, पण मला वाटते उद्धव साहेबांसारखा पहिला असा नेता असेल आपल्याच पक्षाच्या आमदाराला आपणच संपवायचे. दुसऱ्यांचे भाड्याने विकत घ्यायचे हे शिवसेनाप्रमुखांनी कधी केलं नाही. त्यावेळेस पण एका बाजूला राष्ट्रवादी होती, काँग्रेस होती , भाजपा पण होती. असे असताना देखील १४००० च्या लीडने आम्ही सीट आणली. प्रचंड विकास कामे झाली आहेत. आज देखील होत आहेत. तर इथे मुद्दाम अनिल परबला पाठवून आम्हाला संपवण्याचा संपूर्ण कार्यक्रम उद्धवजींनी केला होता. वरचा बसला आहे तो, पाहणारा आहे तो हा जर बदल झाला नसता.
दरम्यान उद्धवजींना तुम्ही एकदा नाही १०० वेळा खेडला आलात तरीही , रामदास कदम किंवा त्याचा मुलगा योगेश कदम ला काहीही फरक पडणार नाही तुम्ही जितक्या वेळेला याला तेवढा धीर आमचा अजून वाढेल कारण लोकांना कळले आहे जनतेला, कोकणवासीयांना कळले आहे कि तुम्ही आमच्यावरती कसा अन्याय केला आहे.