आदित्य ठाकरे पोपटपंची काय करता ?

रामदास कदम यांचा सवाल

आदित्य ठाकरे पोपटपंची काय करता ?

गेले अनेक दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि वरळीतुन निवडणूक लढवावी असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. यावर तुझ्यासाठी तुझ्या बापाने काय केले आहे माहिती आहे का असा खडा सवालच शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी विचारला आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांनी याबाबत आदित्य ठाकरेंना चांगलाच सुनावलंय. आदित्य ठाकरे यांनाच या आव्हांनावरून तुम्हाला या निवडणुकीत निवडून आणण्यासाठी आपले वडील उद्धव ठाकरे यांनी काय काय केले हेच त्यांनी प्रतिक्रिया देऊन सांगितले आहे.  आदित्य ठाकरे यांना निवडून आणण्यासाठी विधान परिषदेचे दोन आमदार दिले आहेत. माझीही विधान परिषद आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात दिली त्यानंतरच ते निवडून आले आहेत.

रामदास कदम काय म्हणाले      

‘तू मुख्यमंत्र्यांना काय आव्हान देतोस’ प्रसिद्धी मिळवण्यासाठी पोपटपंची चालू आहे असा आरोप रामदास कदम यांनी केला आहे. आता या आरोपांना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे काय प्रत्युत्तर देणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.  पुढे आदित्य ठाकरेंनी १०० जागा निवडून आणणार असे वक्तव्य केले आहे. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीने युती केली आहे. मात्र वंचित महाविकास आघाडीत नाही यामुळे २८८ पैकी शिवसेनेच्या वाट्याला समजा ९० जागा आल्या तर शिवसेनेतल्या ९० पैकीच काही जागा वंचितला द्यायला लागणार त्यापैकी २० जागा तरी वंचितला द्यायच्या म्हंटले तर आदित्य ठाकरे १०० जागा कुठून आणणार आणि का वाढवून देणार असा सवाल सुद्धा रामदास कदम यांनी केला आहे.

हे ही वाचा:

अमेरिकेने फोडला चीनचा फुगा; चीनने व्यक्त केला संताप

श्रीराम आणि सीतामाईना मूर्त स्वरूप देणारे मराठमोळे हात

पुणेकर लवकरच घेणार डबलडेकर प्रवासाचा आनंद

आशियातला पहिला हेलिकॉप्टर कारखाना बनवण्याचा बहुमान भारताला

आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे वारंवार शिंदे गटाच्या आमदारांवर खोक्यांचे आरोप करत आहेत. त्यावरून रामदास कदम यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. कदंम म्हणतात, उद्धवजींनी खोके-ओके असे काही बोलू देत ४० आमदारांना विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर खोके दिले जात आहेत. त्यामुळे ते निवडून येणार आहेत. आज ते एकनाथ शिंदेनी बंड केला नसता तर हा बदल झाला नसता तर उद्धव ठाकरेंनी सुद्धा मातोश्री सोडली नसती अजितदादांनी त्यांच्या माजी आमदारांना ताकद देणे थांबवले नसते यातला एकपण आमदार निवडून आला नसता.

 

 

Exit mobile version