आठवलेंच्या ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ पक्षाने काय केले, नागालँडमध्ये…

ऐतिहासिक कामगिरी करून दाखविली

आठवलेंच्या ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ पक्षाने काय केले, नागालँडमध्ये…

The Minister of State for Social Justice & Empowerment, Shri Ramdas Athawale addressing a press conference, in New Delhi on November 24, 2017.

आज महाराष्ट्रातील कसबा आणि पिंपरी चिंचवड येथील पोटनिवडणुकांचा निकाल लागला असून त्याबरोबर ईशान्येकडील निवडणुकीच्या निकालांकडेही सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या रामदास आठवले याच्या पक्षाने नागालँडमध्ये इतिहास रचला आहे.

नागालँडमधील विधानसभा निवडणूक २०२३ मध्ये आठवले गटाच्या दोन आमदार निवडून आल्या आहेत. प्रथमच या  पक्षाच्या  महाराष्ट्राच्या बाहेर दोन ‘महिला आमदार’ या  निवडून आल्या आहेत. सध्या मतमोजणी सुरु असून नागालँडमध्ये भाजप आणि एनडीपीपी सध्या आघाडीवर असून या राज्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या दोन उमेदवार जिंकल्या आहेत. आठवले यांच्या पक्षासाठी ही मोठी गोष्ट असून त्याचा चांगला परिणाम इतर राज्यातील निवडणूक निकालांवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काय आहे सध्याची मतमोजणी?

नागालँड मध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाचे दोन उमेदवार निवडून आले आहेत तर, एनडीपीपीचा एका जागेवर निवडून आला आहे. तर भारतीय जनता पक्षाचे दोन जागांवर उमेदवार निवडून आले आहेत.,आणि बारा जागांवर उमेदवार आघाडीवर आहेत.  नागालँड विधानसभेच्या एकूण ६० जागांसाठी झालेल्या लढतीत सत्ताधारी पक्ष एनडीपीपी आणि भाजपा सध्या आघाडीवर असून राज्यात तेच सत्ता स्थापन करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आठवले पक्षाच्या लिमा ओनेन चँग यांनी नागालँडमधली नोक्सेन जागा जिंकलेली आहे. तर इम्तिचोबा यांनी
तुएनसांग सदर दोन इथली जागा जिंकली आहे. तुएनसांग जिल्ह्यातील नोक्सेन विधानसभेसाठीची जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव होती.ईशान्येकडील नागालँड राज्य हे देशातील सर्वात लहान राज्यांपैकी एक असून २७ फेब्रुवारी २०२३ ला तिथे मतदान पार पडले होते.

Exit mobile version